आंदोलकांचा अश्रुंचा बांध फुटला:, राजे घरात घुसून मारलं,आयाबहिणींना पण सोडल नाहीं ओ!


प्रशासक न्यूज,दि.२सप्टेंबर

जालन्यात आरक्षणासाठी शिस्तबद्धरित्या आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर लाठीमार करण्यात आला. या लाठीहल्ल्यात अनेक आंदोलक जखमी झाले. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेचे राज्यभर पडसाद उमटले आहेत. अनेक ठिकाणी आंदोलन होत आहे. तर राजकीय वर्तुळातूनही या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधकांनी तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागितला आहे. राष्ट्रवादीचे नेते, आमदार रोहित पवार यांनी पहाटे अडीच वाजताच जालन्यात जाऊन आंदोलकांची विचारपूस केली. तर माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनीही जालन्यात जाऊन आंदोलकांची भेट घेतली आहे.

संभाजीराजे यांनी आज सकाळीच अंतरवाली सराटी येथे जाऊन आंदोलकांची भेट घेतली. संभाजीराजे आंदोलकांच्या घरी गेले. त्यांच्यासोबत जमिनीवर बसून त्यांच्याकडून विचारपूस केली. त्यांचं सांत्वन केलं. आम्ही तुमच्यासोबत आहोत. काहीच काळजी करू नका. सर्व नीट होईल, असा धीरही त्यांनी आंदोलकांना दिला.
त्यानंतर संभाजी छत्रपती हे अंबड उपजिल्हा रुग्णालयात गेले. तिथे जाऊन त्यांनी जखमींची विचारपूस केली. उपचाराची माहितीही घेतली. डॉक्टरांशी संवादही साधला. या आंदोलकांना रुग्णालयात येऊन भेटणारे संभाजीराजे हे पहिले नेते होते. थेट शिवरायाच्या वारसाने येऊन आपली विचारपूस केल्याने आंदोलकांना अश्रू अनावर झाले. त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला.

घरात घुसून घुसून मारलं हो
राजे लय बेदम मारहाण केली आम्हाला. घरात घुसून घुसून मारलं राजे आम्हाला. राजे आमच्या आया बहिणीलाही सोडलं नाही हो, असं सांगताना एका आंदोलकाचा अश्रूचा बांध फुटला. या आंदोलकांना रडताना पाहून संभाजीराजेही काही वेळ स्तब्ध झाले.

या सर्व प्रकाराबद्दल छत्रपती संभाजीराजे यांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केला
आंदोलकांचा अश्रुंचा बांध फुटला:, राजे घरात घुसून मारलं,आयाबहिणींना पण सोडल नाहीं ओ! आंदोलकांचा अश्रुंचा बांध फुटला:, राजे घरात घुसून मारलं,आयाबहिणींना पण सोडल नाहीं ओ! Reviewed by Prashasak on सप्टेंबर ०१, २०२३ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.