प्रशासक न्यूज,दि.४सप्टेंबर
मुलींवरील अत्याचाराच्या घटनांनमध्ये वाढदिवसाच्या होत असतानाच मुलीप्रमाणेच आता वृद्ध महिला देखील सुरक्षित आहेत की नाहीत असा प्रश्न निर्माण झाला आहे
दिल्लीत पुन्हा अशीच एक हादरवणारी घटना समोर आली आहे. दिल्लीत एका वृद्ध महिलेवर तरुणाने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला अटक केली आहे. या घटनेनंतर दिल्ली महिला आयोगाच्या प्रमुख स्वाती मालीवाल यांनी दिल्ली पोलिसांना नोटीस बजावली आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, आरोपीने घरात झोपलेल्या वृद्ध महिलेवर बलात्कार केल्यानंतर तरुणाने तिचे ओठही ब्लेडने कापले. सध्या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर दिल्ली पुन्हा हादरली आहे.
दिल्लीतील नेताजी सुभाष प्लेस परिसरात शुक्रवारी एका 85 वर्षीय महिलेवर बलात्कार करण्यात आला आहे. पोलिसांनी या घटनेच्या संदर्भात 28 वर्षीय आकाश नावाच्या आरोपीला अटक केली. याची माहिती दिल्ली महिला आयोगाच्या प्रमुख स्वाती मालीवाल यांनी दिली आहे. स्वाती मालीवाल यांनी दिल्ली पोलिसांना याप्रकरणाची चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
८२वर्षीय वृद्ध महिलेवर २८ वर्ष्याच्या तरुणाकडून अत्याचार,ब्लेडने ओठ कापले
Reviewed by Prashasak
on
सप्टेंबर ०१, २०२३
Rating:
Reviewed by Prashasak
on
सप्टेंबर ०१, २०२३
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: