भाजप आमदारांच्या पुतण्याचा या पक्षात होणार प्रवेश!


प्रशासक न्यूज,दि.२सप्टेंबर

श्रीगोंदा-नगर विधानसभा मतदारसंघाचे भाजप पक्षाचे आमदार बबनराव पाचपुते यांचे पुतणे साजन पाचपुते यांनी हाती मशाल घेण्याचा निर्णय घेतला असून दि.४ सप्टेंबर सोमवारी सायंकाळी ५ वाजता ते मुंबईत मातोश्रीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे(शिवसेना)पक्षात आपल्या समर्थकांसह प्रवेश करणार आहेत साजन पाचपुते काष्टी गावचे सरपंच असून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये ते संचालक म्हणून निवडून आलेले आहेत

काष्टी गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीपासून साजन पाचपुते आणि त्यांचे चुलते भाजपा आमदार बबनराव पाचपुते यांच्यात राजकीय तेढ निर्माण झाला होता सरपंच पदाच्या अटीतटीच्या निवडणुकीत पाचपुते विरोधकांच्या मदतीने साजन पाचपुते यांनी सरपंच पदी बाजी मारली होती त्यानंतर साजन यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेशी जवळीक वाढवली होती मधल्या काही कालावधीत ते खा.श्रीकांत शिंदे यांच्या संपर्कात होते परंतु त्यानंतर मागील काही दिवसांपासून त्यांचा ठाकरे गटाचे खा संजय राऊत यांच्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होता तसेच साजन पाचपुते लवकरच उद्धव ठाकरे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगत होत्या

परंतु आज साजन पाचपुते यांनीच दि ४ सप्टेंबर रोजी ठाकरे गटात प्रवेश करत शिवसेनेची मशाल हाती घेणार असल्याचे जाहीर केले आहे विद्यमान भाजप आमदारांचे पुतणे ठाकरे गटात प्रवेश करत असल्यामुळे तालुक्याचे याकडे लक्ष लागले असून साजन यांच्या या प्रवेशामुळे तालुक्याच्या राजकारणावर याचा काय परिणाम होतो त्याकडेसुद्धा सर्वांचे लक्ष असणार आहे
भाजप आमदारांच्या पुतण्याचा या पक्षात होणार प्रवेश! भाजप आमदारांच्या पुतण्याचा या पक्षात होणार प्रवेश! Reviewed by Prashasak on सप्टेंबर ०१, २०२३ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.