प्रशासक न्यूज,दि.१३ऑगस्ट
दरोडेखोरांनी मुख्य बाजारपेठेत असणाऱ्या बँकेत दरोडा टाकण्याचा डाव रचला. दरोडेखोर बँकेत घुसले पण, त्यांचा दरोड्याचा प्रयत्न फसला. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलिस CCTV फुजेटच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहेत.
सोलापूर शहराची मुख्य बाजारपेठ असणाऱ्या मंगळवार पेठ परिसरातील महावीर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक गुरुवारी रात्री फोडण्याचा प्रयत्न केला. तीन दरवाजे तोडून चोरांनी बँकेत प्रवेश केला. मात्र, लॉकर तोडता न आल्याने बँकेतील जवळपास पाच कोटींची कॅश वाचली आहे.
दरोडेखोर CCTV कॅमेऱ्यात
बँक फोडणारी दरोडेखोर CCTV कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. बँकेचे कामकाज आटपून गुरुवारी रात्री आठ वाजता स्टाफ सह मॅनेजर आणि चेअरमन निघून गेले. यानंतर रात्री साडेआठ वाजता दोन चोरट्यांनी हातात रॉड आणि टॉर्च घेऊन तीन दरवाजे तोडून बँकेमध्ये प्रवेश केला.
बँकेतील ड्रॉवर तपासले मात्र हाती काही लागले नाही. त्यांनी बँकेची मुख्य तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यामध्ये ते अयशस्वी झाले. तिजोरीत जवळपास पाच कोटी रुपये कॅश होती. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून बँकेने याबाबत जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
बँकेत घुसले पण शेवट्च्या क्षणी-- आणि पाच कोटींची रोकड वाचली
Reviewed by Prashasak
on
ऑगस्ट १३, २०२३
Rating:
Reviewed by Prashasak
on
ऑगस्ट १३, २०२३
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: