आज रंगणार हायहोल्टेज ड्रामा,कट्टर प्रतिस्पर्धी चार वर्ष्यानंतर आमने सामने


प्रशासक न्यूज,दि.२सप्टेंबर

आशिया कपमधील तिसरा सामना टीम इंडिया आणि पाकिस्तानमध्ये होणार आहे. दोन्ही संघ चार वर्षानंतर वन डे क्रिकेटमध्ये आमनेसामने आले आहेत. दोघांची हेड-हेड कामगिरी पाहिली तर आशिया कप मध्ये दोन्ही संघ १३ वेळा एकमेकांविरूद्ध खेळले आहेत यामधील ७ सामन्यात टीम इंडियाने तर ५ वेळा पाकिस्तान संघाने विजय मिळवला आहे.

 हाय-व्होल्टेज सामन्याकडे अवघ्या क्रिकेट वर्तुळात लक्ष लागलेलं आहे. सामना दुपारी तीन वाजता सुरू होणार आहे.
भारत आणि पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी आता 4 वर्षांनी आमने सामने येणार असून आज हा महामुकाबला होणार आहे. आता हा सामना जिंकून पाकिस्तानला सुपर 4 मध्ये पोहचण्याची संधी आहे. तर टीम इंडिया विजयी सुरुवात करण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल.
आज रंगणार हायहोल्टेज ड्रामा,कट्टर प्रतिस्पर्धी चार वर्ष्यानंतर आमने सामने आज रंगणार हायहोल्टेज ड्रामा,कट्टर प्रतिस्पर्धी चार वर्ष्यानंतर आमने सामने Reviewed by Prashasak on सप्टेंबर ०१, २०२३ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.