प्रशासक न्यूज,दि.३सप्टेंबर
देशात यंदा मान्सूनवर अल निनोचा प्रभाव दिसला. यामुळे जून आणि ऑगस्ट महिन्यात पाऊस झाला नाही. जुलै महिन्यातील पावसाने काहीसा दिलासा दिला. आता सप्टेंबर महिन्यातील पावसावर शेतकऱ्यांना मोठी आशा आहे. या पावसामुळे रब्बी हंगाम चांगला येईल आणि राज्यातील धरणांमध्ये जलसाठा वाढणार आहे. राज्यात दडी मारलेला पाऊस आता परतू लागला आहे. पुणे हवामान विभागाने मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
कमी दाबाचा पट्टा विदर्भापासून दक्षिण कर्नाटकापर्यंत जात आहे. यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यात ४ सप्टेंबरनंतर मुसळधार पाऊस पडणार आहे. कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात रविवारी मुसळधार पाऊस पडणार आहे. या भागांत यलो अलर्ट जारी केला आहे, असे पुणे हवामान विभागाच्या शास्त्रज्ञ ज्योती सोनार यांनी सांगितले.
हवामान विभागाने मागील 100 वर्षांत प्रथमच ऑगस्ट महिन्यात पावसाचे प्रमाण कमी झाले असल्याचे म्हटले आहे. पुणे आणि परिसरात ऑगस्टमध्ये 40 टक्के कमी पाऊस झाला आहे. परंतु सप्टेंबर महिन्यात परिस्थिती बदलणार आहे. या महिन्यात चांगल्या पावसाची अपेक्षा आयएमडीचे हवामान शास्त्रज्ञ अनुप कश्यपी यांनी व्यक्त केली
आतातरी अंदाज खरा ठरू दे,पाऊस परतणार
Reviewed by Prashasak
on
सप्टेंबर ०२, २०२३
Rating:
Reviewed by Prashasak
on
सप्टेंबर ०२, २०२३
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: