आरोपी सापडत नसल्याच्या व तपास योग्य होत नसल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थ करणार आमरण उपोषण


प्रशासक न्यूज,दि.११ऑगस्ट

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना अटक होत नसल्याच्या व पोलीस तपास योग्य होत नसल्याच्या निषेधार्थ श्रीगोंदा तालुक्यातील एरोंडली येथील ग्रामस्थ व मयत समाधान मोरे याची आई हे श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर दि १४ऑगस्ट सोमवारी रोजी आमरण उपोषण व रस्तारोको आंदोलन करणार आहेत याबाबत त्यांनी श्रीगोंदा तहसीलदारांना निवेदन दिले आहे

निवेदनात म्हंटले आहे की १४ जुलै २०२३ रोजी एरोंडली येथील तरुण समाधान अंकुश मोरे याचे अपहरण करून त्याचा खून करण्यात आला होता या प्रकरणात संबंधित आरोपीनी मयत समाधान ला मारून त्याने आत्महत्या केली असे दाखवून स्वतःच डेड बॉडी श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात आणून पुरावे नष्ट केले होते

या प्रकरणात ग्रामस्थांनी खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली होती तसेच शवविच्छेदनाचा प्रथम व दुय्यम अहवालात तफावत आढळून आली त्यानंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला पण अजूनही या प्रकरणातील पाच आरोपीना अटक करण्यात आलेली नाहीं फाशीदोरी व तुटलेली दोरी जमा नाहीं आरोपी पोलिसांना का सापडत नाहीत याबाबत शंका निर्माण झाली आहे

त्यामुळे उर्वरित आरोपीना तत्काळ अटक करून या प्रकरणाचा तपास योग्यरीतीने व्हावा या मागणीसाठी हे उपोषण करण्यात येणार आहे
आरोपी सापडत नसल्याच्या व तपास योग्य होत नसल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थ करणार आमरण उपोषण आरोपी सापडत नसल्याच्या व तपास योग्य होत नसल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थ करणार आमरण उपोषण Reviewed by Prashasak on ऑगस्ट १०, २०२३ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.