प्रशासक न्यूज,दि.११ऑगस्ट
जागतिक आदिवासी दिन श्रीगोंदा शहरात प्रथमच मोठ्या जल्लोशात साजरा करण्यात आला.श्रीगोदा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर आदिवासी पारधी भिल्ल समाजाची लोकवस्तस्ती असुन आदिवासी पारधी समाजाच्या वतीने जागतिक आदिवासी दिनानिमित्त भव्य रॅली व मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.श्रीगोंदा शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे महामानवांच्या प्रतिमेला अभिवादन करून या रॅलीची सुरुवात झाली. ढोलताशांच्या गजरात बसस्थानक व बाजारपेठ मार्ग शनिचौक आणि शेवटी तहसिल कार्यालयासमोर आदिवासी समाजातील महानायकांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी श्रीगोंदा तालुक्याचे विद्यमान आमदार माजी मंत्री बबनराव पाचपुते, प्रांत पद्माकर गायकवाड, अपर तहसिलदार, हेमंत ढोकले, नायब तहसिलदार निलेश वाघमारे, गट विकास अधिकारी रामकृष्ण जगताप यांच्यासह उपस्थितांनी आदिवासी माहानायकांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
याबाबत आयोजकांनी सांगितले की श्रीगोंदा तालुक्यात एकुण आदिवासी लोकसंख्येच्या चार टक्के आदिवासी असताना त्यांच्या सामाजिक, आर्थिक, प्रशैक्षणिक, सांस्कृतिक प्रश्नांना सोडविण्याचा प्रशासन प्रयत्न करत नाही. आदिवासी पारधी समाजाकडे पुर्वीपासुनच चोर म्हणून पहाण्याचा दृष्टीकोन त्यामुळे हा समाज इतर समाजापासून दूर गावकुसाबाहेर असायचा पण आज सुशिक्षीत पिढी समाजाचे योग्य प्रकारे नेतृत्व करत असुन आदिवासींना सन्मानाने समजाने पहावे या हेतुन आदिवासींची फेटे बांधुन मिरवणूक काढण्यात आली. त्याचबरोबर आदिवासी पारधी समाजासाठी स्वतंत्र सांस्कृतिक भवन व स्मशानभूमिसाठी प्रयत्न करावेत अशी मागणी यावेळी आयोजकांनी केली.
या कार्यक्रमासाठी राजेंद्र काळे, आरपीआयचे तालुकाध्यक्ष राजाभाऊ जगताप,प्रमोद काळे,युवराज घोडके,अभिजीत भोसले, जयश्री काळे, दिगंबर काळे,रतन पवार, मयुर भोसले,छाया काळे, श्रीकांत काळे,रिमा काळे,सागर भोसले, परशुराम चव्हाण,सुकृत काळे,शौकत काळे,राहुल भोसले,संगिता काळे.माधुरी भोसले, स्वप्निल भोसले, निषा भोसले,महेंद्र भोसले,धीरज भोसले, मिटर पावार,वैशाली काळे, राणी काळे,सागर भोसले,ज्योती काळे,सुहास काळे,नितीन चव्हाण,समीर काळे,काशीनाथ काळे,हिराबाई भोसले,ताई काळे,आरती काळे,जिदा चव्हाण,महेंद्र काळे,आकभर काळे आदी मान्यवर उपस्थित होते.
आदिवासी दिन प्रथमच जल्लोशात साजरा
Reviewed by Prashasak
on
ऑगस्ट १०, २०२३
Rating:
Reviewed by Prashasak
on
ऑगस्ट १०, २०२३
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: