प्रशासक न्यूज,दि.१९जुलै
पोलीस आणि आरोपींमध्ये होणारी झटापट, गोळीबार हे दृश्य आपल्याला चित्रपटात पहायला मिळतात परंतु चित्रपटाच्या कथानकाला ही लाजवेल अशी घटना जामखेड शहरात आज रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे
आरोपीना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकावर जीवघेणा हल्ला करत त्यांच्या दिशेने पिस्तूल रोखत गोळीबार करण्याचा प्रयत्न सरांईत गुन्हेगाराने केला परंतु त्याचवेळी पोलीस निरीक्षकांनी प्रसंगावधान दाखवत आपल्या शासकीय रिव्होलव्हर मधून आरोपीच्या दिशेने गोळीबार करत त्याला जखमी केल्यामुळे मोठा अनर्थ टळला आणि पोलिसांनी आरोपीना पकडले
याबाबत जामखेड पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की आज रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक अनिल भारती, पोलीस नाईक अविनाश ढेरे, संतोष कोपणर, पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश मांडगे, गणेश भागडे, देविदास पळसे, कुलदीप घोळवे, चालक हवालदार भगवान पालवे हे पोलीस पथक जामखेड शहरात रात्रीची गस्त घालत असताना तपणेशवर रोड,अर्बन बँकेसमोर अदनान शेख व प्रज्वल पालवे या दोघांनी या गस्ती पथकाला थांबवून प्रताप पवार नावाच्या व्यक्तीने व त्याच्या दोन साथीदारांनी अदनान शेख यांच्या डोक्याला पिस्तूल लावून जीवे मारण्याची धमकी देत शेख यांच्याकडील मोटार कार क्रमांक MH 12 KT 4795 ही कार जबरदस्तीने घेऊन गेल्याची माहिती दिली
सदर गाडीला जी पी एस असल्यामुळे ही गाडी सारोळा रोड परिसरात असल्याची माहिती समजताच पोलिसांनी अधिकची कुमक मागवत सदर कार व आरोपिंचा शोध घेतला असता सदर मोटार कार ही क्रिकेट मैदान सारोळा रोड याठिकाणी मिळून आली त्यानंतर पोलिसांनी आरोपिंचा कसून शोध घेतला असता सदर तिन्ही आरोपी खर्डा येथील साई हॉटेल येथे मिळून आले पोलिसांनी आरोपीना स्वाधीन होण्याचे आवाहन केले असता त्यातील दोन आरोपीनी पोलिसांवर जीवघेणा हल्ला केला त्याचवेळी आरोपी प्रताप उर्फ बाळा पवार याने त्याच्याकडील पिस्तूल पोलिसांच्या दिशेने रोखत पोलिसांवर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला
त्याचवेळी प्रसंगावधान राखत जामखेड पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी आरोपी पवार याच्या पायावर गोळी झाडत त्याला जखमी केले त्यानंतर पोलिसांनी झडप घालून आरोपीना पकडले
पो ना संतोष कोपनर व अदनान शेख या दोघांनी दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपी प्रताप उर्फ बाळा पवार,त्याचे साथीदार शुभम बाळासाहेब पवार व काकासाहेब उत्तम डुचे यांच्यावर जामखेड पोलीस स्टेशनला विविध कलमनंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे तिन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून गोळीबारत जखमी झालेल्या प्रताप पवारला उपचारासाठी अ नगर येथे पाठवण्यात आले आहे सदर आरोपी हा सरांईत गुन्हेगार असून त्याच्यावर जामखेड, दत्तनगर(पुणे),किनगाव,रेणापूर(लातूर)या पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत
सदरची कामगिरी श्री राकेश ओला पोलीस अधीक्षक सो.अहमदनगर, श्री प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक सो अहमदनगर, श्री विवेकानंद वाखारे उपविभागीय पोलीस अधिकारी सो कर्जत विभाग यांचे मार्गदर्शन खाली पोलीस निरीक्षक महेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक अनिल भारती, पोलीस नाईक अविनाश ढेरे, संतोष कोपणर, पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश मांडगे, गणेश भागडे, देविदास पळसे, कुलदीप घोळवे, चालक हवालदार भगवान पालवे ,मोबाईल सेल अहमदनगर नेमणुकीचे पोलीस कॉन्स्टेबल नितीन शिंदे, राहुल गुंडू यांनी सदरची कामगिरी केली असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सुनील बडे,व पोलीस उपनिरीक्षक अनिल भारती करीत आहेत
प्रसंगावधान राखत पोलीस निरीक्षकांनी गोळी झाडली आणि अनर्थ टळला
Reviewed by Prashasak
on
जुलै १९, २०२३
Rating:
Reviewed by Prashasak
on
जुलै १९, २०२३
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: