प्रशासक न्यूज,दि.१८जुलै
श्रीगोंदा तालुक्यातील येरोंडली गावातील तरुण समाधान अंकुश मोरे वय-१९ याच्या मृत्यूप्रकरणी अखेर काल रात्री उशिरा श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दिलीप गणपत मांडे,पाडुंरग उंडे,प्रविण दिलीप मांडे, अभि दिलीप मांडे,बाळासाहेब मांडे,अक्षय त्रंबक मांडे,आकाश बाळासाहेब मांडे सर्व रा.मढेवडगाव ता. श्रीगोंदा जि.अहमदनगर या सात जणांविरोधात मयत तरुणाची आई रुपाली अंकुश मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे
फिर्यादित म्हंटल्याप्रमाणे मयत तरुण समाधान हा मढेवडगाव येथील दिलीप मांडे यांच्याकडे ट्रॅक्टर चालक म्हणून काम करत होता परंतु त्या कामाव्यतिरिक्त इतर काम सांगत असल्यामुळे व किरकोळ कारणातून त्या दोघांमध्ये वाद झाल्यामुळे समाधान हा मे महिन्यापासून कामावर न जाता घरीच होता आठ ते दहा दिवसांपूर्वी ट्रॉलीचे काम करायचे म्हणून दिलीप मांडे हे समाधानला घेऊन गेले होते परंतु त्या दोघांमध्ये वाद झाल्यामुळे तो काम न करता परत आला होता दि १४जुलै रोजी रात्री दिलीप मांडे व पांडुरंग उंडे हे दोघे समाधान याच्या घरी गेले आणि ट्रॅक्टर उभा आहे तू चालक म्हणून चल असे दिलीप मांडे यांनी विनंती केली परंतु आधीच्या वादामुळे समाधान त्यांच्यासोबत जाण्यास तयार नव्हता परंतु त्यावेळी मोठ्या भावाने समजावून सांगितल्यामुळे तो मांडे यांच्यासोबत बोलेरो गाडीत बसून गेला
दुसऱ्या दिवशी सकाळी समाधानचा भाऊ संतोष याला दिलीप मांडे यांनी फोन करून अर्जंट काम आहे मढेवडगाव ला ये असे सांगितले संतोष मोरे हे तिथे गेले असता समाधान याने फाशी घेतल्याचे त्यांना समजले परंतु तो अपघात नसून घातपात असल्याचा संशय घरच्यांसह गावाकऱ्यांनी व्यक्त केला आणि काल रात्री ससून रुग्णालयाचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर श्रीगोंदा पोलीस ठाण्यात उशिरा खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला
चौकट /-गावकरी आक्रमक,नातेवाईक,ग्रामस्थांचा संताप,पोलीस ठाण्यात गोंधळ समाधान याच्या संशयांस्पद मृत्यू झाल्यामुळे येरोंडली येथील गावकरी चांगलेच आक्रमक झाले होते १५जुलै रोजी त्याचा मृतदेह आढळून आल्यानंतर गावाकऱ्यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात धाव घेत समाधानाच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या आरोपीनविरोधाता खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत ठिय्या आंदोलन केले यावेळी त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले तसेच काल रात्री देखील ससून रुग्णालयाचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर येरोंडली ग्रामस्थांनी रात्री श्रीगोंदा पोलीस ठाणे गाठत खुनाचा गुन्हा दाखल करण्यासाठी गोंधळ घातला गुन्हा दाखल झाल्यानंतर सुद्धा आरोपीना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी गावकरी आक्रमक झाले होते यावेळी काही संतप्त लोकांनी पोलीस ठाण्याच्या आवारातील झाडाच्या कुंड्याची देखील तोडफोड केल्याची माहिती समजली आहे
चौकट/-शवविच्छेदन अहवालावर संशय,दोनवेळा शवविच्छेदन श्रीगोंदा पोलिसांनी सदर तरुणाच्या मृत्युप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती फाशी घेतल्यामुळे मृत्यू झाल्याचा अहवाल श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयातून देण्यात आला परंतु त्या शवविच्छेदन अहवालावर संशय घेत पुन्हा शवविच्छेदन करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली त्यानुसार काल ससून पुणे इथे त्याचे दुसऱ्यांदा शवविच्छेदन करण्यात आले त्यात मयत समाधानाच्या डोक्यात व छातीला सूज असल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिला त्यामुळे या प्रकरणात संशय निर्माण झाला असून पोलीस आता तपास करत आहेत
चौकट/-तीन दिवसानंतर अंत्यसंस्कार
दि १४ जुलै रात्री ते १५जुलै सकाळच्या दरम्यान समाधान याचा मृत्यू झाला होता परंतु त्याच्या संशयस्पद मृत्यू झाल्यामुळे ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली होती खुणाचा गुन्हा दाखल होत नसल्यामुळे व दोनवेळा झालेल्या शवविच्छेदनामुळे काल रात्री म्हणजे तीन दिवसानंतर मयत समाधान याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले
'त्या' तरुणाच्या मृत्युप्रकरणी अखेर सात जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल
Reviewed by Prashasak
on
जुलै १८, २०२३
Rating:
Reviewed by Prashasak
on
जुलै १८, २०२३
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: