प्रशासक न्यूज,दि.६जुलै
अजित पवार यांनी भाजप शी हातमिळवणी करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि त्यामुळे राज्यात राष्ट्रवादी पक्षात दोन गट पडले त्यामुळे कोण शरद पवार यांच्यासोबत तर कोण अजित पवारांकडे अश्या चर्चा राज्यात होत असतानाच श्रीगोंद्यात काय चित्र असणार याबाबत सर्वांना उत्सुकता होती
माजी आ राहुल जगताप हे अजित पवार यांचे समर्थक मानले जायचे परंतु तरीसुद्धा ते शरद पवार यांच्यासोबत राहणार असं बोललं जात होत काल मुंबईत शरद पवार गटाच्या बैठकीला राहुल जगताप यांनी आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांसह हजेरी लावत ते शरद पवार यांच्यासोबतच असल्याचे दाखवून दिले
काल मुंबईत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या बैठकीस श्रीगोंदा तालुक्यातील मा.आमदार राहुल जगताप यांच्या सोबत राष्ट्रवादीच्या सर्व तालुकाध्यक्षानी हजेरी लावली त्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष हरिदास शिर्के,युवकचे तालुकाध्यक्ष ऋषिकेश गायकवाड,विद्यार्थी तालुकाध्यक्ष विजय खेतमाळीस, सामाजिक न्यायचे तालुकाध्यक्ष संदीप उमाप, युवकचे शहराध्यक्ष सोनू कोशिंबीरे,सुशीलकुमार शिंदे आदी उपस्थित होते..! त्यामुळे श्रीगोंदा तालुक्यातील राष्ट्रवादीच्या सर्व सेलचे पदाधिकारी शरद पवार यांच्या सोबत असल्याचे स्पष्ट झाले.
चौकट/-नाहाटांची मात्र दादांना साथ
श्रीगोंदा तालुका राष्ट्रवादी शरद पवार यांच्यासोबत असताना राष्ट्रवादीचे राज्य बाजारसमितीचे अध्यक्ष बाळासाहेब नाहाटा यांनी मात्र अजित पवार यांना साथ दिली आहे याआधीच त्यांनी अजित पवार यांची मुंबईत भेट घेऊन शुभेच्छा देत ते फोटो सोशल मीडियावरं टाकून आपण अजित पवार यांच्यासोबत असल्याचे स्पष्ट संकेत दिले होते तसेच काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार व अजित पवार गटाने मुंबईत जोरदार शक्तिप्रदर्शन केले,दोन्ही गटाने स्वतंत्रपणे राज्यभरातील पदाधिकाऱ्यांच्या बैठका आयोजित केल्या होत्या यावेळी माजी आमदार राहुल जगताप आपल्या सर्व समर्थकांसह शरद पवार यांच्या बैठकीला उपस्थित असताना नहाटा यांनी मात्र आपल्या कार्यकर्त्यांसोबत अजित पवार यांच्या बैठकीला हजेरी लावल्याची माहिती समजली
त्यामुळे कालपर्यत एकत्र काम करणारे राहुल जगताप व बाळासाहेब नाहाटा हे दोघे दोन वेगळ्या गटात गेल्यामुळे तालुक्यात काम करताना त्या दोघांची भूमिका काय राहणार याबाबत जाणून घेण्यासाठी संपर्क साधला असता दोघांशी संपर्क होऊ शकला नाहीं

श्रीगोंद्यात राष्ट्रवादी साहेबांसोबत,नाहाटांची मात्र दादांना साथ!
Reviewed by Prashasak
on
जुलै ०६, २०२३
Rating:
Reviewed by Prashasak
on
जुलै ०६, २०२३
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: