प्रशासक न्यूज,दि.२४जुलै
श्रीगोंदा पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांनी आज सकाळी आकरा वाजण्याच्या सुमारास अचानक श्रीगोंदा काष्टी रस्त्यावर छत्रपती संभाजी महाराज चौकात मोठ्या फौजफाट्यसह नाकाबंदी सुरु करत विना लायसन वाहन चालवणारे, वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघणं करणाऱ्यावर कारवाईला सुरुवात केली
पोलीस निरीक्षकांनी अचानक सुरु केलेल्या या वाहन कारवाईमुळे विना परवाना वाहन चालवणारे महाविद्यालयीन विद्यार्थी,विद्यार्थिनी,तरुण यांच्यासह वाहन चालकांची चांगलीच धांदल उडाली यावेळी विनानंबर वाहने,ट्रिपल सीट वाहन चालवणारे, यांच्यासह वाहतूकीचे नियम मोडणाऱ्यांवर आज पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारत दांडात्मक कारवाई केली
चौकट/-कारवाईत सातत्य हवे
पोलिसांनी आज केलेल्या कारवाईचे स्वागत होत असले तरी या कारवाईत सातत्य रहाणे गरजेचे आहे अशी अपेक्षा सर्वसामान्य व्यक्त करत आहेत एकदिवस कारवाई न करता दररोज अशी कारवाई करणे जरुरी आहे
चौकट/-पोलीस निरीक्षकांनी कायद्याचा धाक निर्माण करणे गरजेचे
श्रीगोंदा शहरात मोठ्या संख्येने महाविद्यालये आहेत त्यामुळे बाहेरून शहरात येणाऱ्या तरुण तरुणीची संख्या मोठी आहे अनेक टवाळखोर महाविद्यालयीन तरुणीना त्रास देतात त्यामुळे महाविद्यालय भरताना आणि सुटताना पोलिसांनी त्याठिकाणी गस्त घालणे जरुरी आहे तसेच शहरातील मागील काही दिवसातील घटना पाहता पोलीस निरीक्षकांनी स्वतः शहरात फिरून सर्व घडामोडीवर लक्ष ठेवत कायद्याचा धाक निर्माण करणे जरुरी आहे
पोलीस निरीक्षक अचानक रस्त्यावर उतरले आणि--
Reviewed by Prashasak
on
जुलै २४, २०२३
Rating:
Reviewed by Prashasak
on
जुलै २४, २०२३
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: