ट्रॅक्टर ने कारला समोरून जोराची धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना श्रीगोंदा काष्टी रस्त्यावर सातव वस्ती,जिल्हा परिषद शाळेजवळ आज रात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली आहे
विजय गोरख कुदळे रा मेहेत्रे मळा,श्रीगोंदा असे या अपघातात मयत झालेल्या व्यक्तीचे नाव असून विकास अर्जुन मेहेत्रे या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत
कुदळे व मेहेत्रे हे आज रात्री एक वाजण्याच्या सुमारास होंडा सिटी कार क्र एम एच १२ बि व्ही ७३५८ हिच्यामधून श्रीगोंदा काष्टी रस्त्याने जात असताना समोरून आलेल्या ट्रॅक्टर ने त्यांच्या कारला जोराची धडक दिल्यामुळे भीषण अपघात झाला या अपघातात होंडा सिटी कार चक्काचूर झाली आहे
सदर अपघाता बाबत रविराज कुदळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात ट्रॅक्टर चालका विरोधात श्रीगोंदा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे
सदर अपघात घडल्यानंतर हॉटेल अनन्या चे मालक अतुल शेंडगे व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी अपघातस्थळी धाव घेत मदत केली
Reviewed by Prashasak
on
जुलै ०३, २०२३
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: