ग्रामदैवताच्या पालखी सोहळ्यासाठी लोटला हजारोंचा जनसागर



प्रशासक न्यूज,दि.१९जून

श्रीगोंदा शहराचे ग्रामदैवत संत शेख महंमद महाराज पालखीचे आज सकाळी पंढरपूर कडे प्रस्थान झाले पालखी सोहळ्याचे हे पहिलेच वर्ष असून प्रस्थानासाठी हजारोंचा जनसागर लोटला होता या सोहळ्यासाठी सुंदर असा रथ बनवण्यात आला होता हा रथ ओढण्यासाठी असलेली बैलजोडी सर्वांचं लक्ष वेधून गेली

आमदार बबनराव पाचपुते,माजी आमदार राहुल जगताप,काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे,घनश्याम शेलार,बाबासाहेब भोस,नगराध्यक्षा शुभांगी पोटे तसेच तहसीलदार मिलिंद कुलथे, पो नि ज्ञानेश्वर भोसले या मान्यवरांच्या हस्ते बैलजोडी व आश्वाचे पूजन करण्यात आले सकाळी मंदिरात पादुकाणचे पूजन करण्यात आले त्यानंतर मंदिर परिसरात टाळ मृदूंगाच्या गजरात ज्ञानोबा माऊलीच्या जयघोशात हजारो भाविकांच्या उपस्थितीत पालखीचे प्रस्थान झाले

संपूर्ण शहराला नगर प्रदक्षिणा घालून पालखी पांढपूरच्या दिशेने रवाना झाली शहरात प्रदक्षिणा मार्गांवर ठिकठिकानी रांगोळ्या काढून पुष्पवृष्टी करून पालखीचे ठिकठिकाणी मोठ्या जल्लोषत स्वागत करण्यात आले

पालखीचे हे पहिलेच वर्ष आहे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून शेख महंमद महाराज यांचा राज्यात नावलौकिक आहे पंढरपूरला जाणाऱ्या पालख्यांमध्ये दहा पालख्याना मानाचे स्थान आहे पुढच्या वर्षी अकरावी मानाची पालखी म्हणून शेख महंमद महाराज पालखीची शासन दरबारी नोंद होणार असल्याची माहिती अशोक आळेकर यांनी दिली

*अथांग जनसागर लोटला*
पालखी सोहळ्याचे पहिलेच वर्ष असताना सुद्धा आज प्रस्थानावेळी हजारोनाचा जनसागर पालखीला निरोप देण्यासाठी लोटला होता यात महिलांची संख्या मोठी होती

या पालखी सोहळ्याच्या नियोजनासाठी मागील दोन महिन्यापासून अशोक आळेकर,गोपाळ मोटे पाटील,नानासाहेब कोथिंबीरे,सतीश मखरे,भाऊसाहेब खेतमाळीस यांच्यासह शेख महंमद महाराज यात्राकमिटी तसेच अनेक जणांनी मोठी मेहनत घेतली पोलीस प्रशासनाने नियोजनासाठी चोख बंदोबस्त ठेवला होता

ग्रामदैवताच्या पालखी सोहळ्यासाठी लोटला हजारोंचा जनसागर ग्रामदैवताच्या पालखी सोहळ्यासाठी लोटला हजारोंचा जनसागर Reviewed by Prashasak on जून १९, २०२३ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.