प्रशासक न्यूज,दि.९जून
औरंगजेबा विषयीची स्टोरी फेसबूक अकाऊंटला ठेवल्यामुळे काल दुपारी एका परप्रांतीय तरुणाला भररस्त्यात चांगलाच चोप दिल्याची घटना श्रीगोंदा शहरात घडली होती या मारहानीचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायररलं झाला होता
त्यानंतर पोलिसांनी अशी वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला होता परंतु काल रात्री उशिरा पोलिसांनी मारहाण करणाऱ्या चार तरुणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे
मोहम्मद आरिफुल्स आरिफ अन्सारी,वय 21 या मारहाण झालेल्या तरुणाने श्रीगोंदा पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून कालिदास,गणेश, अमोल,सागर(पूर्ण नावे माहिती नाहीत)यांच्यासह तीन ते चार अनोळखी इसमांविरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गैर कायद्याची मंडळी जमवून लाथा बुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे
'त्या' मारहाण प्रकरणात चार जणांनविरोधात गुन्हा दाखल
Reviewed by Prashasak
on
जून ०९, २०२३
Rating:
Reviewed by Prashasak
on
जून ०९, २०२३
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: