भाजपाच्या ‘पश्चिम महाराष्ट्र : माध्यम प्रमुख’पदी अमोल कविटकर !


प्रशासक न्यूज,दि.६मे

भारतीय जनता पार्टीच्या ‘पश्चिम महाराष्ट्र : माध्यम प्रमुख’पदी पत्रकार अमोल कविटकर यांची नियुक्ती करण्यात आली असून निवडीचे पत्र भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. कविटकर ११ वर्षे टिव्ही पत्रकारितेत कार्यरत होते. निवडीचे पत्र देतेवेळी ‘महाविजय २०२४’ अभियानाचे प्रमुख आमदार श्रीकांत भारतीय, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये हेही उपस्थित होते.

कविटकर यांनी ‘एबीपी माझा’मध्ये मुंबई आणि छत्रपती संभाजीनगरसह ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘साम टिव्ही’मध्ये पुणे ब्युरोमध्ये काम केले आहे. दैनंदिन घटनांसह शहरीकरणाचे प्रश्न, ग्रामीण समस्या आणि शेतीच्या प्रश्नांबाबतच्या वार्तांकनाचा अनुभव आहे. शिवाय सांगली आणि चिपळूनच्या महापुराचे त्यांनी केलेले कव्हरेज चर्चेचा विषय ठरले होते.

‘आपला प्रसार माध्यमांशी असलेला संपर्क पक्ष संघटनेतील माध्यम विभागाच्या कामास गती देण्यास निश्चितपणे उपयुक्त ठरेल, असा विश्वास असून ही जबाबदारी पार पाडताना माध्यम विभागातील सर्वांना सोबत घेऊन भाजपाचे कार्य जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी अथक परिश्रम कराल’, अशी अपेक्षा व्यक्त करत प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी कविटकर यांना शुभेच्छा दिल्या.
भाजपाच्या ‘पश्चिम महाराष्ट्र : माध्यम प्रमुख’पदी अमोल कविटकर ! भाजपाच्या ‘पश्चिम महाराष्ट्र : माध्यम प्रमुख’पदी अमोल कविटकर ! Reviewed by Prashasak on मे ०६, २०२३ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.