ट्रॅक्टरची दुचाकीला धडक, पाच वर्षांचा चिमुकला ठार


प्रशासक न्यूज,दि.६ मे

ट्रॅक्टरने दुचाकीला समोरून जोराची धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात एका पाच वर्ष्याच्या चिमुकल्याला आपला जीव गमवावा लागल्याची दुःखद घटना श्रीगोंदा शहरात काल दि ५ रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली असून अर्णव संदीप आढाव वय ५ वर्षे रा धानोरा,ता जामखेड हल्ली राहणार ठाणे असे या अपघातात मृत्यू पावलेल्या मुलाचे नाव आहे

सदर अपघाता बाबत मुलाचे वडील संदीप आढाव यांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून ट्रॅक्टर चालक अशोक बाबा दातीर रा औटेवाडी याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे

या अपघाताबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की आढाव हे लग्नानिमित्त श्रीगोंद्यातील नातेवाईकांकडे आले होते काल सायंकाळी त्यांची दुचाकी एम एच १६,डीडी २१३४ हिच्यावरून त्यांची पत्नी व मुलगा यांच्यासह औटेवाडी वरुण जुना कोकणगाव रस्त्याने श्रीगोंद्याकडे जात असताना त्याचवेळी समोरून येणाऱ्या ट्रॅक्टर क्र एम एच १६,ए एम १८११ याने आढाव यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली यात दुचाकी खाली पडून आढाव जखमी झाले तसेच त्यांचा मुलगा अर्णव हा गंभीर जखमी झाला त्याला उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आले मात्र उपचारादरम्यान अर्णव चा मृत्यू झाला

या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे पुढील तपास पो ना बी एल खरतोडे हे करत आहेत
ट्रॅक्टरची दुचाकीला धडक, पाच वर्षांचा चिमुकला ठार ट्रॅक्टरची दुचाकीला धडक, पाच वर्षांचा चिमुकला ठार Reviewed by Prashasak on मे ०६, २०२३ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.