अनुसूचित जाती जमातीसाठी स्वतंत्र बजेट कायदा व्हावा/-दीपक केदार


प्रशासक न्यूज,दि.५मे

सामाजिक न्याया साठी अनुसुचित जाती जमाती उपाय योजनेचा स्वतंत्र बजट कायदा झाला पाहिजे.. या वर्षी १६४९४ कोटी रुपयांची घोषणा बजट मध्ये झाली.. मोठया निधीची नुसती घोषणा केली जाते. वास्तवात हा निधी पळवला जातो किंवा वळवला जातो.. त्यावर दरोडा टाकण्यात येतो..अशी टीका ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक भाई केदार यांनी केली श्रीगोंदा येथे त्यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला

कर्नाटक, आंध्र, तेलंगणा, हरियाणा, पंजाब, राजस्थान राज्यात न्याय विभागाचा स्वतंत्र कायदा करून, Sc.. St आर्थिक सबलता देण्याचे काम केले.. ते पुरोगामी महाराष्ट्रात होत नाही हे दुर्दैव आहे.. असेही त्यांनी या पत्रकार परिषदेत नमूद केले..

तसेच याबाबत जन जागृती करून, लुटारुंचे बुरखे फाडणार असून यासाठी जिल्हा, विभाग व राज्य स्तरावर आंदोलन छेडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पुढे त्यांनी नमूद केले की, खेळाडू महीला न्यायासाठी आक्रोश करत असताना ज्या जंतर मंतर ने देशाला आण्णा हजारे यांची ओळख करून दिली. त्या अण्णा हजारेनां महीला आंदोलकांचा आक्रोश दिसत नाही का..?याबाबत हजारे यांना पत्र पाठवणार असल्याचे त्यांनी सांगितले

देशात महिला अत्याचार वाढत आहे तरीसुद्धा प्रधान मंत्री मन की बात मधे त्यावर काहीच बोलत नाहीत.त्याचं बरोबर लातूरच्या उमरगा कोठ गावात पोलीस निरीक्षक बंदुकीचा धाक दाखवून बाबसाहेबांच्या जयंतीची मिरवणूक रोखतो.. त्यांचें निलंबन झाले पाहिजे.. अशीही त्यांनी मागणी केली.

बारसू रिफायनरी आंदोलकांना ऑल इंडिया पँथर सेना पाठिंबा देत आहे.. नक्सलवादी , खलिस्तानी म्हणुन आंदोलनांला चिरडण्याचा केन्द्र व राज्य सरकारची सवय आहे. असेही ते म्हणाले..

यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या स्थानिक प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी सांगीतले की, श्रीगोंदा तालुक्यात मागासवर्गीय,आदिवासीं समाजावर अन्यायाच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत ॲट्रोसिटी नुसार गुन्हा दाखल झाला तर आंदोलन करण्यात येतात याबाबत पोलीस अधीक्षकांना भेटणार असून ऍट्रॉसीटी कायद्याचा गैरवापर न करण्याचे देखील त्यांनी आवाहन यावेळी केले
तसेच इंदुमील येथे उभारण्यात येणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक व समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या स्मारकाबाबत सरकार फक्त दिशाभूल करून महापुरुषांच्या नावाने मताचे राजकारण करत असल्याची टीका यावेळी केदार यांनी केली

या पत्रकार परिषदेला ऑल इंडिया पँथर सेनेचे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष अमर घोडके, तालुकाध्यक्ष संजय रणशिंग, नितिन शिंदे, योगेश गंगावणे, अक्षय आठवले, अभिजित सोनवणे, अनिल गंगावणे, विलास कांबळे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते...

अनुसूचित जाती जमातीसाठी स्वतंत्र बजेट कायदा व्हावा/-दीपक केदार अनुसूचित जाती जमातीसाठी स्वतंत्र बजेट कायदा व्हावा/-दीपक केदार Reviewed by Prashasak on मे ०५, २०२३ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.