श्रीगोंद्यात साकारणार छ. संभाजी महाराजांचा जगातील पहिला आश्वारूढ पुतळा


प्रशासक न्यूज,दि.५मे

छत्रपती संभाजी महाराज यांचा आतापर्यत देशात किंवा जगात कुठेही आश्वावर रूढ असलेला पुतळा नसून तो श्रीगोंदा शहरात उभारण्यात येणार असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे नेते अरविंद कापसे यांनी दिली

शहरातील पेडगाव रस्त्यावर आज छत्रपती संभाजी महाराज चौक सुशोभीकरणाच्या कामाचे भूमिपूजन आ बबनराव पाचपुते,नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे,नगराध्यक्षा शुभांगी पोटे यांच्याहस्ते संपन्न झाले यावेळी नगरसेवक, व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

श्रीगोंदा नगरपरिषदेने या कामासाठी ५३,७०,२५४रुपयांचा निधी मंजूर केला असून लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे

आज या कार्यक्रमाच्या भूमिपूजनानंतर आयोजित छोटेखानी कार्यक्रमात अरविंद कापसे हे बोलत होते या चौकाचे छत्रपती संभाजी महाराज चौक नामकरण व सुशोभीकरणासाठी अरविंद कापसे,नाना शिंदे यांच्यासह त्यांच्या सहकार्यानी अनेक दिवसांपासून नगरपरिषदेकडे पाठपुरावा केला होता

यावेळी बोलताना कापसे म्हणाले की आम्ही केलेल्या संघर्ष्याला आज यश आले याठिकाणी चौकाचे होणारे सुशोभीकरणाचे काम दर्जेदार व्हावे तसेच या कामातून जो नफा शिल्लक राहणार आहे त्यातून याठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांचा आश्वारुढ पुतळा उभारण्यात येणार असून तो देशातीलच नव्हे तर जगातील पहिला आश्वारुढ पुतळा ठरणार आहे स्मारकचे काम सुरु असतानाच पुतळ्याच्या परवानगी साठी सर्वानी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले तसेच कापसे यांनी आपल्या वडिलांच्या समरणार्थ या पुतळ्याच्या कामासाठी १,११,१११रुपयांची देणगी देखील यावेळी जाहीर केली

यावेळी बोलताना राजेंद्र नागवडे यांनी संभाजी महाराजांचा जगातील पहिला पुतळा श्रीगोंद्यात उभा राहणार ही सर्वांसाठीच गौरवाची बाब असून त्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही दिली

नगराध्यक्ष पती तथा नगरसेवक मनोहर पोटे यांनी यावेळी आ बबनराव पाचपुते यांचे तोंडभरून कौतुक करून श्रीगोंदा शहरासाठी आ पाचपुते यांचे मोठे योगदान असून विकासकामात ते कधी राजकारण करत नसल्याचे सांगितले

आ बबनराव पाचपुते यांनी यावेळी मोजक्या शब्दात शुभेच्छा देत मदत करण्याचे आश्वासन दिले
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत गोरे यांनी केले तर आभार बापुशेठ गोरे यांनी मानले
श्रीगोंद्यात साकारणार छ. संभाजी महाराजांचा जगातील पहिला आश्वारूढ पुतळा श्रीगोंद्यात साकारणार छ. संभाजी महाराजांचा जगातील पहिला आश्वारूढ पुतळा Reviewed by Prashasak on मे ०५, २०२३ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.