श्रीगोंदा नगरपरिषदेच्या राजकारणात पुन्हा राजकीय भूकंप!


प्रशासक न्यूज,दि.२मे

श्रीगोंद्याच्या नगराध्यक्षा शुभांगी पोटे यांच्यावर त्यांच्याच काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी अविश्वास ठराव दाखल केल्याची घटना ताजी असतानाच आज श्रीगोंदा नगरपरिषदेच्या भाजपच्या उपनगराध्यक्षा सौ ज्योती सुधीर खेडकर यांच्याविरोधात त्यांच्याच भाजप पक्षाच्या दहा नगरसेवकांनी एकत्र येत आज अविश्वास ठराव दाखल केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे

सौ खेडकर यांना पदावरून हटवण्याबाबत आज भाजपच्या दहा नगरसेवकांनी नगराध्यक्षा शुभांगी पोटे यांच्याकडे अर्ज दाखल केला असून त्यावर भाजप च्या गटनेत्या श्रीमती छायाताई गोरे,नगरसेवक आसाराम(अशोक)खेंडके,नगरसेवक शहाजी खेतमाळीस,नगरसेविका श्रीमती सुनीता खेतमाळीस,नगरसेवक संग्राम घोडके,नगरसेवक रमेश लाढाणे,नगरसेविका मनीषा लांडे,नगरसेविका मनीषा वाळके,नगरसेविका दीपाली औटी,नगरसेविका वनिता क्षीरसागर या भाजपच्या दहा नगरसेवकांच्या सह्या आहेत

नगरपरिषदेची निवडणूक झाल्यानंतर भाजपच्या सर्व नगरसेवकांना संधी मिळावी यासाठी प्रत्येकाला सहा सहा महिने उपनगराध्यक्ष करण्याचे ठरले होते त्यानुसार विद्यमान उपनगराध्यक्षा सौ ज्योती खेडकर यांना सहा महिने पूर्ण झाल्यानंतर त्यांना राजीनामा देण्यास सांगूनही त्या राजीनामा देत नसल्यामुळे अविश्वास ठराव दाखल केल्याचे भाजपच्या वतीने सांगण्यात आले आहे

चौकट/- दवाखान्यातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर राजीनामा देऊ असे सांगूनही अविश्वास दाखल का केला हे समजले नाही/-उपनगराध्यक्षा सौ ज्योती खेडकर
मी सध्या दवाखान्यात ऍडमिट आहे दवाखान्यातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर मी राजीनामा देते असे सर्व भाजप नगरसेवकांना सांगितले होते तरीसुद्धा माझ्याविरोधात अविश्वास ठराव का दाखल केला हे मला समजले नाही तसेच राजीनाम्या बाबत प्रतापसिंह पाचपुते यांच्या व्यतिरिक्त कोणत्याही वरिष्ठ नेत्याने माझ्याशी चर्चा केलेली नाही किंवा मला राजीनामा दे असे सांगितले नव्हते राजीनामा देणार असल्याचे सांगूनही आमच्याच सहकारी नगरसेवकांनी असे टोकाचे पाऊल का उचलले याबाबत अनभिज्ञ आहोत
श्रीगोंदा नगरपरिषदेच्या राजकारणात पुन्हा राजकीय भूकंप! श्रीगोंदा नगरपरिषदेच्या राजकारणात पुन्हा राजकीय भूकंप! Reviewed by Prashasak on मे ०२, २०२३ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.