प्रसिद्ध नृत्यांगना गौतिम पाटील यांचा उद्या श्रीगोंद्यात कार्यक्रम



प्रशासक न्यूज,दि.२मे

अनाथ आणि बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना मोफत राहण्याची सोय व्हावी यासाठी नियोजित वसतिगृहाच्या बांधकाम मदतीसाठी उद्या बुधवार दि.३ मे रोजी सायंकाळी ७ वाजता महाराष्ट्रातील प्रसिद्ध नृत्यांगना सबसे कातिल गौतिम पाटील यांच्या भव्य लावणी व ऑर्केस्ट्रा च्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती कार्यक्रमाचे आयोजक श्रीगोंदा खादी ग्रामोद्योगचे माजी चेअरमन भगवान राव गोरखे व सामाजिक कार्यकर्त्या मीराताई शिंदे यांनी प्रशासक न्यूज शी बोलताना दिली

हा कार्यक्रम श्रीगोंदा शहरातील बायपास रस्त्यावरील नायरा पंपाच्या शेजारील मोकळ्या मैदानात आयोजित केला आहे या कार्यक्रमासाठी २००रु,३००रु,५००रु असा तिकीट दर आकरण्यात आला आहे कार्यक्रमाच्या ठिकाणी दिवसभर तिकीटविक्री सुरु राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली

पारगाव रस्त्यावर लहुजी समाज सेवा मंडळामार्फत ५० विद्यार्थी राहू शकतील एवढे वसतिगृह उभारण्यात येणार आहे त्या ठिकाणी मुलांची मोफत राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे त्या नियोजित वसतिगृहाच्या बांधकामाच्या मदतीसाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे

*महिलांनी कार्यक्रमाला येण्याचे आवाहन*
सदर कार्यक्रमात महिलांना बसण्यासाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आली आहे अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने कार्यक्रम होणार असून महिलांनी देखील या कार्यक्रमासाठी यावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्त्या व जेष्ठ पत्रकार मीरा शिंदे यांनी केले आहे

तसेच समाजातील दानशूर लोकांनी जास्तीत जास्त तिकीट घेऊन या वसतिगृहाच्या बांधकामासाठी हातभार लावण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे
प्रसिद्ध नृत्यांगना गौतिम पाटील यांचा उद्या श्रीगोंद्यात कार्यक्रम प्रसिद्ध नृत्यांगना गौतिम पाटील यांचा उद्या श्रीगोंद्यात कार्यक्रम Reviewed by Prashasak on मे ०२, २०२३ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.