टेम्पोची दुचाकीला धडक,चार ते पाच किमी अंतर दुचाकी नेली ओढत, वेगवेगळ्या अपघातात दोन ठार


प्रशासक न्यूज,दि.१९एप्रिल

श्रीगोंदा तालुक्यात काल दि १८रोजी सायंकाळी साडेसाहे ते साडेसात वाजण्याच्या सुमारास नगर दौंड रस्त्यावर निमगाव खलू आणि ढोकराई फाटा अश्या दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या विचित्र अपघातात दोन दुचाकीस्वारांना जागीच आपला जीव गमवावा लागला आहे

अनिल गुलाब साळवे वय ५० रा राहींजवाडी ता श्रीगोंदा आणि तानाजी ज्ञानदेव शिंदे वय ३२ रा उरुळीकांचन(पुणे)अश्या अपघातात मृत्यू पावलेल्या दोघांची नावे आहेत
काल सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास साळवे हे दुचाकीवरून दळण आणण्यासाठी जात असताना ढोकराई येथे नगरच्या दिशेने चाललेल्या आयषर टेम्पोने त्यांना समोरून जोरदार धडक दिली या अपघातात साळवे यांचा मृत्यू झाला परंतु ही धडक एवढी जोराची होती की टेम्पोच्या पुढच्या भंपर मध्ये दुचाकी अडकली ती चालकाने ढोकराई पासून ते लोणी व्यंकनाथ पर्यत तशीच ओढत नेली लोणी या ठिकाणी देखील या टेम्पो चालकाने एका बोलेरो जीप ला धडक दिली लोणी गावात काही लोकांनी या टेम्पोचालकाला आडवून बेदम चोप देऊन त्याला पोलिसांच्या हवाली केले

तर उरुळीकांचन येथील रहिवासी असणारे तानाजी शिंदे हे आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी जात असताना निमगाव खलू नजिक सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली त्यात शिंदे यांचा मृत्यू झाला

घटनास्थळी पो हे कॉ मुकेश बडे यांनी भेट दिली तर सहायक फौजदार विठ्ठल बडे यांनी लोणी व्यंकनाथ येथे जाऊन आयषर टेम्पोच्या चालकाला ताब्यात घेतले
टेम्पोची दुचाकीला धडक,चार ते पाच किमी अंतर दुचाकी नेली ओढत, वेगवेगळ्या अपघातात दोन ठार  टेम्पोची दुचाकीला धडक,चार ते पाच किमी अंतर दुचाकी नेली ओढत, वेगवेगळ्या अपघातात दोन ठार Reviewed by Prashasak on एप्रिल १८, २०२३ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.