प्रशासक न्यूज,दि.१७ एप्रिल
शहरातील सिद्धार्थनगर येथे समाज बांधवांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला फुले आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती उत्सव सिध्दार्थनगर व ससाणेनगर यांनी सक्रिय सहभाग नोंदवून विविध सामाजिक कार्यक्रम यशस्वी करण्यात आले. समितीचे अध्यक्ष लक्ष्मण घोडके यांनी याबाबत माध्यमांना सविस्तर माहिती दिली.दिनांक ११ एप्रिल २०२३ रोजी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यात महामानवाच्या प्रतिकृती रंगवत त्यांना विद्यार्थ्यांकडून अभिवादन करण्यात आले. तालुक्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
दिनांक १३ एप्रिल रोजी श्रीगोंदा शहरातील सिद्धार्थनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे भव्य रक्तदान शिबीर घेण्यात आले. यावेळी शहरातील व परिसरातील तरुणांनी पुढाकार घेऊन रक्तदान केले. श्रीगोंद्याचे तहसिलदार मिलिंद कुलथे यांच्या हस्ते रक्तदान केलेल्या रक्तदात्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.
संध्याकाळी ठीक ६:०० वाजता आंबेडकर सांस्कृतीक भवन येथे परभणी येथील व्याख्याते आर. एस यादव सर यांचे महापुरूषांच्या जीवन चरित्रावर व्याख्यान संपन्न झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड संभाजी बोरुडे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.
दिनांक १४ एप्रिल रोजी मध्यरात्री डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला समाजातील ज्येष्ठ व्यक्तींच्या हस्ते दीप प्रज्वलन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
त्याच दिवशी सकाळी महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिकृती पुतळ्यांना पुष्प माला अर्पण करण्यात आली. यावेळी समाज बांधवांसह, राजकीय नेते उपस्थित होते. याठिकाणी आमदार बबनराव पाचपुते, घनश्याम शेलार, तहसिलदार मिलिंद कुलथे, पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले सह कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले होते. यानंतर सबंध शहरातून महापुरूषांच्या पुतळ्यांची सवाद्य शोभा यात्रा काढण्यात आली. यावेळी शहरातील नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते व समाज बांधव मोठया प्रमाणात सहभागी झाले होते.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष लक्ष्मण घोडके, हृदय दादा घोडके, नगरसेवक सोनालीताई घोडके, नगरसेवक संग्राम घोडके, अविनाश घोडके, विशाल घोडके, श्रीकांत घोडके, गणेश घोडके, भारत घोडके, भाऊसाहेब घोडके, विश्वास घोडके, पत्रकार मिराताई शिंदे, मनीषा घोडके, शोभा घोडके, रेश्मा घोडके, शिंदे मॅडम, रावसाहेब घोडके, डॉ. संतोष घोडके, सूरज घोडके, मुकूंद सोनटक्के, संदीप मोटे सर सह समाज बांधव नमूद कार्यक्रमात मोठया संख्येने सहभागी झाले होते.
विविध सामाजिक उपक्रमांनी श्रीगोंद्यात डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
Reviewed by Prashasak
on
एप्रिल १६, २०२३
Rating:
Reviewed by Prashasak
on
एप्रिल १६, २०२३
Rating:


कोणत्याही टिप्पण्या नाहीत: