प्रशासक न्यूज,दि.१४एप्रिल
बाजार समितीची निवडणूक शेवटच्या टप्प्यावर आलेली आहे.बाजारसमितीचा कारभार शेतकरी हिताचा होण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत सद्यस्थिताीला राजकारणाची दिशा बदलत असताना वाईट प्रवृत्तींनी चांगल्या संस्थेत राजकारण करत धुडगूस सुरू केलेला आहे त्या वाईट प्रवृत्तीना लगाम घालून श्रीगोंदा बाजारसमितीत जिल्ह्यात आदर्शवत असा कारभार करू असे आश्वासन आमदार बबनराव पाचपुते यांनी दिलेश्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार बबनराव पाचपुते,नागवडे कारखान्याचे अध्यक्ष तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे,नागवडे कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब भोस यांच्या मार्गदर्शनाखाली आज श्रीगोंद्यात नक्षत्र मंगल कार्यालयात भव्य शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता.अध्यक्षस्थानी आमदार बबनराव पाचपुते हे होते.
यावेळी बोलताना पाचपुते म्हणाले की, ४० वर्ष आपण राजकारण करत असताना गलिच्छ राजकारण कधीही केले नाही. शिवाजीराव नागवडे व मी एकमेकांच्या विरोधात उभे राहिलो.परंतु तरीसुद्धा एकमेकांच्या सुखदुःखात कायम सोबत राहिलो मतभेद होते पण मनभेद होऊ दिला नाही आता ती परिस्थिती तालुक्यात राहिलेली नाही. बाजारसमिती निवडणुकीसाठी मोकळ्या मनाने आम्ही एकत्र आलेलो असून, कार्यकर्त्यांनी गडबडून जाण्याचे कारण नाही. राजेंद्र नागवडे, बाबासाहेब भोस, आणि मी या निवडणुकीत जो उमेदवार देऊ त्याचे प्रामाणिकेपणे काम कार्यकर्त्यांनी करावे भरघोस मतांनी उमेदवार निवडून आणावेत असे सांगत मी फुटणार नाही आणि कुणालाही फूटू देणार नाही,अशी शपथ पाचपुते यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिली
नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यावेळी बोलताना म्हणाले की, तालुक्याच्या जडणघडणीत खऱ्या अर्थाने आमदार पाचपुते व शिवाजीराव नागवडे बापू यांचे योगदान आहे.मात्र काही दृष्ट प्रवृत्तीच्या लोकांनी स्वार्थ साधण्यासाठी कधी बापू तर कधी आमदार पाचपुते यांचा आधार घेऊन तालुक्यात बनवाबनवी चे राजकारण केले. नुकत्याच खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत विश्वासघात करून गलिच्छ राजकारण केल्यामुळे सर्वसामान्य माणूस संतापला आहे. बाजार समितीच्या निवडणुकीत मतदारांनी कुठल्याही अमिषाला बळी पडू नये असे आवाहन करत दृष्ट प्रवृत्तींना बाजूला करण्यासाठी आम्ही एकत्र आल्याचे त्यांनी सांगितले
यावेळी प्रामुख्याने बाबासाहेब भोस,दत्तात्रय पानसरे, बंडोपंत पंधरकर, प्रकाश बोरुडे, पोपटराव खेतमाळीस, रामदास झेंडे,अरुणराव पाचपुते,ऍड बाळासाहेब काकडे,ऍड डी डी घोरपडे, भगवानराव पाचपुते आदींनी मनोगत व्यक्त करत विरोधकांचा चांगला समाचार घेतला.
या मेळाव्यास भगवानराव पाचपुते, अरुणराव पाचपुते,आदेश नागवडे, प्रतापसिंह पाचपुते, दिनकर पंधरकर, प्रेमराज भोईटे, पुरुषोत्तम लगड, कुंडलिक दरेकर, नंदकुमार कोकाटे, संतोष लगड, डी डी घोरपडे, मनोहर पोटे, स्मितल वाबळे, धनसिंग भोईटे, गणपतराव काकडे,योगेश भोईटे,प्रशांत गोरे आदींसह पाचपुते नागवडे भोस गटाचे असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते .
प्रास्ताविक दत्तात्रय पानसरे यांनी केले. सूत्रसंचालन धर्मनाथ काकडे यांनी केले. उपस्थित कार्यकर्त्यांचे प्रतापसिंह पाचपुते यांनी आभार मानले.
शेतकरी हिताचा कारभार व्हावा यासाठी बाजारसमितीला आम्ही एकत्र/-आमदार पाचपुते
Reviewed by Prashasak
on
एप्रिल १४, २०२३
Rating:
Reviewed by Prashasak
on
एप्रिल १४, २०२३
Rating:


कोणत्याही टिप्पण्या नाहीत: