प्रशासक न्यूज,दि.११एप्रिल
पोलीस असं म्हटलं तरी भल्याभल्यांचा थरकाप उडतो त्याच पोलीस स्टेशनची पायरी चढताना लोक शंभर वेळा विचार करायचे याला कारण होत समाजात पोलिसांचा असलेला धाक
परंतु सध्याची श्रीगोंदा पोलीस स्टेशनची परिस्थिती पाहता पोलिसांचा धाक कमी होत चाललाय की काय याची शंका येते
याच कारण म्हणजे आओ जाओ घर तुम्हारा अशी पोलीस स्टेशनची अवस्था झाली आहेया आधी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे अधिकारी विनाकारण विनाकामं पोलीस स्टेशनला येणाऱ्या लोकांना विचारणा करून त्यांना खडेबोले सुनावत होते परंतु अलीकडे अशी विचारणा करणारे कुणी नसल्यामुळे याठिकाणी नको त्या लोकांची गर्दी पाहायला मिळते
*बिनधास्त आरोपीना भेटा*
श्रीगोंदा पोलीस स्टेशनला विविध गुन्ह्यातील अनेक आरोपी जेलमध्ये ठेवलेले आहेत या आरोपीना भेटण्यासाठी जेलरची परवानगी घेऊन ठराविक वेळ ठरवून दिली जाते तेवढ्या वेळेत आणि परवानगी असलेल्या लोकांनाच आरोपीना भेटण्याची मुभा असते परंतु कुणाचीही भीती न बाळगता आजकाल कुणीही जेलच्या बाहेरच्या बाजूने जाऊन या आरोपीशी मोकळ्या मनाने गप्पा मारत आहेत त्यामुळे या लोकांना कुणाचा धाक राहिलाय का नाही असा प्रश्न पडतोसिसिटीव्ही बंद*
*जेलरची परवानगी घेऊन लोक भेटतात/-पो नि ज्ञानेश्वर भोसले*
आरोपीना भेटायला येणारे लोक जेलरची परवानगी घेऊन भेटत आहेत एकच वेळी जास्त लोकांना भेटण्याची परवानगी देऊ नये असे जेलरला सांगण्यात आलेले आहे तरीसुद्धा या भेटण्यावर नियंत्रण आणण्यासाठी आम्ही त्याठिकाणी ब्यारि्केटिंग करत आहोत अशी प्रतिक्रिया श्रीगोंदा पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांनी दिली

भयं इथलं संपत चाललंय की काय?
Reviewed by Prashasak
on
एप्रिल ११, २०२३
Rating:
Reviewed by Prashasak
on
एप्रिल ११, २०२३
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: