श्रीगोंद्यात काँग्रेस आणि भाजपचा हातात हात


प्रशासक न्यूज,दि.५एप्रिल

देशात आणि राज्यात काँग्रेस आणि भाजप यांच्यात टोकाचा संघर्ष सुरु असताना श्रीगोंद्यात मात्र भाजप आणि काँग्रेस यांनी एकमेकांच्या हातात हात दिला आहे त्याला निमित्त आहे श्रीगोंदा कृषिउत्पन्न बाजारसमितीची होणारी निवडणूक
ही निवडणूक काँग्रेस आणि भाजप एकत्रित लढणार असल्याची माहिती आज भाजप आणि काँग्रेस पक्षाच्या मुख्य नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली यावेळी नेत्यांसह दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हातात हात घेऊन हम साथ साथ हे च्या घोषणा देखील दिल्या

या पत्रकार परिषदेसाठी काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे,नागवडे कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब भोस, भाजपचे युवा नेते प्रतापसिंह पाचपुते,दत्तात्रय पानसरे,लक्ष्मण नलगे,टिळक भोस, काँग्रेस तालुकाध्यक्ष धर्मनाथ काकडे,भाजप तालुकाध्यक्ष संदीप नागवडे सर,आदेशशेठ नागवडे,दादासाहेब नेटके,मिलींद दरेकर,योगेश भोईटे,प्रशांत दरेकर,सुभाष शिंदे,अरुणराव पाचपुते,नानासाहेब कोथिंबीरे,वैभव पाचपुते यांच्यासह काँग्रेस व भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

यावेळी बोलताना
काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी भाजप सोबत होणाऱ्या युतीचे खापर माजी आमदार राहुल जगताप यांच्यावर फोडले
खरेदी विक्री संघात सोबत घेऊन जगताप यांनी आमचे उमेदवार पाडले त्यामुळे आम्हाला आज भाजपसोबत युती करावी लागत असल्याचे त्यांनी सांगितले तसेच इथून मागे बाजारसमितीत मोठा गैरकारभार झाला इथून पुढ तिथं कामकाज चांगल व्हावं म्हणून एकत्रित निवडणूक लढवून आम्ही ती जिंकणार आहोत असा आत्मविश्वास राजेंद्र नागवडे यांनी व्यक्त केला

या युतीबाबत माहिती देताना
भाजप युवानेते प्रतापभैय्या पाचपुते म्हणाले कि, समोर वाईट प्रवृत्तीचे लोक एकत्र आलेत त्यांना थांबवण्यासाठी आणि चांगल्या विचारांची माणसं बाजारसमितीत निवडून जावीत यासाठी आम्ही युती केल्याचे सांगितले

नेहमी बाळासाहेब नाहाटांसोबत असणारे
टिळक भोस यांनी तुम्ही इकडे कसे असं विचारले असता,नाहटा आणि मी मित्र आहोत पण आमच्यात टोकाचे तात्विक मतभेद आहेत नाहटा हे प्रतिषठेचे राजकारण करतात त्यांना जोपर्यत गरज आहे तोपर्यत विश्वासात घेतात आणि नंतर मात्र विरोध करतात तसेच सोबत राहून विरोधकाला मदत करतात त्यांच्या या दुटप्पी भूमिकेमुळे आपण त्यांच्यापासून राजकीय फारकत घेतल्याचे भोस यांनी स्पष्ट केले तसेच त्यांना राज्य बाजारसमिती महासंघाच अध्यक्षपद कस मिळालं या गोष्टीचे आपण साक्षीदार असून त्यांना अध्यक्षपद मिळवून देण्यात आपलाही हातभार असल्याचे टिळक भोस यांनी यावेळी आवर्जून सांगितले

तर
दत्तात्रय पानसरे हे देखील नाहटांसोबत होते त्यांनासुद्धा हा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता याबाबत निवडणूक निकालानंतर बोलेल असं सांगून त्यांनी उत्तर देणे टाळले

*एकत्र आल्यावर आम्ही घास मोजत नाहीत*

भाजप काँग्रेस ची युती झाली परंतु जागावाटपाचा काही फॉर्मुला ठरला का असा प्रश्न विचारला असता आम्ही एकत्र आल्यावर घास मोजत नाहीत कुणी किती जागा लढवायच्या याबाबत काही निर्णय झालेला नाही फक्त आम्ही एकत्र लढणार अशी प्रतिक्रिया बाबासाहेब भोस यांनी दिली

*पाच वर्षे सोबत राहण्याचा विश्वास*

खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत सर्वपक्षीय नेते एकत्र येऊनसुद्धा पाडापाडीचे राजकारण झाले तस आता भाजप आणि काँग्रेस एकत्र आल्यावर सुद्धा पाडापाडीचे राजकारण होणार नाही का असे विचारले असता तसे काही होणार नाही आम्ही इथून पुढे पाचवर्षे सोबत राहू असा विश्वास बाबासाहेब भोस यांनी व्यक्त केला

*वरिष्ठाकडून मोकळीक अन कार्यकर्त्यांना सवय*

देशात राज्यात काँग्रेस आणि भाजप एकमेकांच्या विरोधात असताना तुम्ही असे एकत्र लढत आहात याबाबत वरिष्ठ नेते काही बोलत नाहीत का असे विचारले असता त्यांनी स्थानिक पातळीवर आम्हाला मोकळीक दिली आहे असे बाबासाहेब भोस यांनी सांगितले तर या युतीबाबत कार्यकर्ते नाराज नाहीत का असे विचारले असता कार्यकर्त्यांना सुद्धा आता अश्या युतीची सवय झाल्याचे भोस यांनी सांगितले
श्रीगोंद्यात काँग्रेस आणि भाजपचा हातात हात श्रीगोंद्यात काँग्रेस आणि भाजपचा हातात हात Reviewed by Prashasak on एप्रिल ०५, २०२३ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.