राहुल जगताप यांनी तालुक्याचे राजकारण दूषित केले/-राजेंद्र नागवडे


प्रशासक न्यूज,दि.४एप्रिल

श्रीगोंदा तालुक्यात सध्या गलिच्छ राजकारण सुरू आहे परंतु आम्ही कुणावरही घाणेरडे आणि चुकीचे आरोप करणार नाही सर्वसामान्य कार्यकर्त्यांना श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीत काम करण्याची संधी मिळावी म्हणून ही निवडणूक लढवत असून यात पक्षीय राजकारणाचा काही संबंध नाही बाजार समिती निवडणुकीत कुणासोबत जायचं काय करायच याबाबतची भूमिका उद्या सकाळी जाहीर करू असे नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले राहुल जगताप हे श्रीगोंदा तालुक्याचे राजकारण दूषित करीत आहेत असा आरोप करत जगताप व आण्णासाहेब शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन केलेल्या आरोपांना नागवडे यांनी चोख प्रत्युत्तर दिले

या पत्रकार परिषदेसाठी ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस,काँग्रेस तालुकाध्यक्ष धर्मनाथ काकडे,काष्टी सोसायटीचे चेअरमन राकेश पाचपुते,संचालक सुभाष काका शिंदे,प्रशांत दरेकर,दादासाहेब नेटके उपस्थित होते

कुकडी साखर कारखाना आर्थिक अडचणीत असल्याचे कारण सांगून राहुल जगताप यांनी मागील विधानसभा निवडणूक लढवली नव्हती परंतु आता कारखान्याची किती भरभराट झाली हे मला माहित नाही पण जगताप यांना मात्र आता निवडणुकीचे वेध लागले आहेत आमच्या सर्व संस्था किती दर्जेदार आहेत हे लोकांना माहिती आहे जनतेनेच आता चांगलं काम करणाऱ्या लोकांचा निर्णय करावा असे मत नागवडे यांनी यावेळी व्यक्त केले

चौकट/-त्यांना मदत करून चूक केली
आत्तापर्यत तुम्ही राहुल जगताप,साजन पाचपुते यांना मदत केली आणि आज तेच तुमच्या विरोधात आहेत असे का असे विचारले असता फक्त स्वार्थ साधायचा असेल तेव्हा त्यांना नागवडे आठवतात परंतु त्यांना मदत करून चूक केली असे नागवडे यांनी सांगितले

*स्वबळावर त्यांनी निवडणूक लढवून दाखवावी/-*
दुसऱ्यांची मदत घेऊन निवडणूक लढवता असा आरोप करणाऱ्या राहुल जगताप यांनी त्यांच्यासोबत असणारी भाजप व काँग्रेसची माणसं बाजूला ठेवून त्यांनी आधी स्वबळावर निवडणूक लढवून दाखवावी असे प्रतिआवाहन नागवडे यांनी जगताप यांना दिले

नागवडे कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब भोस यांची चौफेर फटकेबाजी
माजी आमदार राहुल जगताप आणि अण्णासाहेब शेलार यांनी दोन दिवसांपूर्वीच पत्रकार परिषद घेऊन भोस हे नेमक्या कुठल्या पक्षात आहेत असा सवाल उपस्थित करून भोस यांनी गद्दारी केल्याचा आरोप केला होता त्या आरोपांचे खंडन करत मी कुठं आणि कधी कुणासोबत गद्दारी केली हे शेलार यांनी दाखवून द्यावे मी राजकारणातून संन्यास घेईल असे भोस यांनी सांगितले

*कुकडीच्या उष्ट्या पंतरवाळ्यांवर जगणाऱ्यांनी मला निष्ठा शिकवू नये*

शेलार हे बबनराव पाचपुते यांच्या बोटाला धरून राजकारणात आले तसा मी स्वतःच्या हिमतीवर राजकारणात आलो शेलार यांना ज्यांनी मोठं केलं त्या पाचपुतेशी त्यांनी गद्दारी केली,त्यामुळे गद्दारीचा आरोप करणाऱ्या आणि कुकडीच्या उष्ट्या पंतरवाळ्यांवर जगणाऱ्या आण्णासाहेब शेलार यांनी मला पक्षनिष्ठा शिकवू नये असे खडेबोले भोस यांनी यावेळी शेलार यांना सुनावले

*राहुल जगताप यांनी पोरकटपणा सोडावा*

राहुल जगताप यांना नागवडे कुटूंबाने आमदार केले मग आत्ताच नागवडेंबद्दल जगताप यांच्या मनात पोटशुळ का उठला ते बबनराव पाचपुते यांना विरोधक समजतं नाहीत तर ज्यांनी त्यांना मदत केली त्या राजेंद्र नागवडे यांना आपला मुख्य विरोधक समजतात हे चुकीचे असून राहुल जगताप यांनी पोरकटपणा थांबवावा असा वडीलकीचा सल्ला भोस यांनी दिला

*मी कायम राष्ट्रवादीतच,पण जगताप यांनी कायम राष्ट्रवादीसोबत राहावं*

मी शरद पवार यांना मानतो मी कायम राष्ट्रवादीतच आहे आणि याबाबत मला कुणाकडे स्पष्टीकरण देण्याची गरज नाही परंतु श्रीगोंद्यात राष्ट्रवादी करायच आणि नगर तालुक्यात गेलं कि कर्डीलेंसोबत राहायचं ही राहुल जगताप यांची दुटप्पी भूमिका असून याबाबत माझ्याकडे पुरावे आहेत त्यामुळे मी कोणत्या पक्षात हे विचारण्यापेक्षा जगताप यांनी तालुक्यात राष्ट्रवादी सोबत रहावे असा खोचक टोमणा भोस यांनी जगताप यांना लगावला

*त्यांना नगरसेवक सांभाळता आले नाहीत*
तुमचा मुलगा गणेश भोस यांनी काँग्रेसच्या नगराध्यक्षाविरोधात भूमिका घेत थेट शिंदे गटात प्रवेश केला हे योग्य वाटतं का असं विचारलं असता नगराध्यक्षाना आपले नगरसेवक सांभाळता आले नाहीत त्याला मी काय करणार असे उत्तर बाबासाहेब भोस यांनी दिले

एकूणच उन्हाचा कडक्यासोबतच बाजारसमिती निवडणुकीच्या पार्शवभूमिवर श्रीगोंदा तालुक्याचे राजकीय वातावरण देखील तापायला सुरुवात झाली आहे
राहुल जगताप यांनी तालुक्याचे राजकारण दूषित केले/-राजेंद्र नागवडे राहुल जगताप यांनी तालुक्याचे राजकारण दूषित केले/-राजेंद्र नागवडे Reviewed by Prashasak on एप्रिल ०४, २०२३ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.