नेत्यांमध्येच वाढत चाललेत वाद,तालुक्यातील जनता म्हणते कुणाकडे मागायची दाद


प्रशासक न्यूज,दि.१०एप्रिल

श्रीगोंदा तालुक्याचे राजकारण दिवसेंदिवस वेगळ्या दिशेने भरकटत चालले आहे पक्षनिष्ठा,प्रामाणिकपणा,नेत्यांशी एकनिष्ठ राहणे या गोष्टी श्रीगोंद्याच्या राजकारणातून इतिहास जमा होत आहेत कोणता नेता कोणत्या पक्षात आणि कोणता कार्यकर्ता कोणत्या नेत्यासोबत याबाबत काहीच थांग पत्ता लागायला तयार नाही तालुक्यातील राजकारणाची पातळी दिवसेंदिवस खालावत चालली आहे


तालुक्यात नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची वाढेलेली भाऊगर्दी यामुळे अगदी साधारण निडणुकीला सुद्धा मोठं महत्व प्राप्त होऊ लागलं आहे त्यामुळे आता श्रीगोंदा तालुक्यात कोणत्याही निवडणुका लागल्या तरी नेते आणि त्यांचे कार्यकर्ते ती निवडणूक प्रतिष्ठेची करत आहेत
याचाच प्रत्यय खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत पाहायला मिळाला
आता सुद्धा होत असलेल्या बाजारसमिती निवडणुकीसाठी आजी माजी आमदार कारखानदार, विविध पदाधिकारी यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे सत्ता मिळवण्यासाठी वाट्टेल ते हेच ब्रीदवाक्य सध्या नेतेमंडळींनी अवलंबले आहे

या सत्तासंघर्ष्याच्या नादात नेतेमंडळी पातळी सोडून राजकारण करत आहेत एकमेकांवर टोकाचे आरोप करत आहेत
नेत्यांच्या या वादात तालुक्यातील जनता मात्र वाऱ्यावर आहे
नेतेच सत्तेसाठी आपसात भांडत असल्यामुळे आपल्या समस्या सोडवण्यासाठी नेमकी दाद कुणाकडे मागावी असा प्रश्न श्रीगोंदा तालुक्यातील जनतेला पडला आहे नेत्यांच्या या सत्तासंघर्ष्यात तालुक्यातील महत्वाचे प्रश्न मात्र जैसे थेच राहत आहेत

*बेरोजगारांच्या संख्येत वाढ*
श्रीगोंदा तालुक्यात मोठ्याप्रमाणत शिक्षण संस्था आहेत त्यामुळे सुशिक्षित तरुणांची संख्या मोठी आहे परंतु तालुक्यात रोजगाराची सोय नसल्यामुळे अनेक तरुणांना शहराची वाट धरावी लागत आहे तालुक्यात एमआयडीसीचा प्रश्न तसाच प्रलंबित आहे त्यामुळे बेरोजगारांची संख्या वाढली आहे या महत्वाच्या प्रश्नाकडे पाहायला मात्र नेतेमंडळींना वेळ नाही

*विविध शासकीय कार्यालयात अनेक कामे पेंडिंग,नागरिकांची अडचण *
महसूल,पोलीस,आरोग्य,वीज,पंचायत समिती अश्या विविध शासकीय कार्यालयात सामान्य नागरिकांची अनेक कामे प्रलंबित आहेत हेलपाटे मारूनसुद्धा लोकांची कामे होत नाहीत परंतु सर्व नेते आपल्या स्वार्थाच्या आणि सत्तेच्या राजकारणात मशगुल झाले असून या सर्व प्रशासकीय व्यवस्थेकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे त्यामुळे तालुक्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कुणाचा वचक राहिला नसल्याचेच चित्र आहे

*रस्ते,पाणी,वीज,आरोग्य यासह पायाभूत समस्यांकडे दुर्लक्ष*
श्रीगोंदा तालुक्यातील अनेक भागातील रस्त्यांची मोठी दुरावस्था झाली आहे, कुकडीच्या पाण्याचा प्रश्न सतत शेतकऱ्यांना भेडसावत आहे,अनेक गावामध्ये विजप्रश्न जैसेथेच आहे,तालुक्यात आरोग्य सेवेविषयी मोठे प्रश्न आहेत,शहरात उपजिल्हा रुग्णालय व्हावे अशी मागणी अनेक वर्ष्यापासून होत आहे या सर्व नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्याकडे लक्ष द्यायला मात्र पुढऱ्यांना वेळ नाही

*दूध भेसळीच्या प्रश्नावर कुणीच बोलायला तयार नाही*
श्रीगोंदा तालुक्यात दूध भेसळीचे रॅकेट उघड झाले त्याबाबत विविध वृत्तपत्रानी सातत्याने या विषयाचा पाठपुरावा केला संभाजी ब्रिगेडचे टिळक भोस यांनी या प्रश्नांवर आझाद मैदानावर आंदोलन केले परंतु तालुक्यातील दिग्गज नेत्यांनी मात्र या प्रश्नावर मौन बाळगणे पसंत केले लोकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या या महत्वाच्या विषयाकडे सुद्धा नेत्यांनी डोळझाक केली हे विशेष

*बापू आणि दादांच्या राजकारणाची आठवण*
श्रीगोंदा तालुक्यात आमदार बबनराव पाचपुते व स्व शिवाजीराव नागवडे हे एकमेकांचे राजकीय प्रतिस्पर्धी तालुक्याचे सत्ताकेंद्राचे राजकारण या दोघांभोवती फिरायचे हे दोन्ही नेते राजकारणातील एकमेकांचे कट्टर विरोधक होते परंतु त्यांनी कधीही तालुक्यातील राजकारणाची पातळी ढासळू दिली नाही तालुक्याची आजची परिस्थिती पाहता या दोन्ही नेत्यांनी केलेल्या सुसंस्कृत राजकारणाची आठवण सामान्यांना झाल्याशिवाय राहत नाही
नेत्यांमध्येच वाढत चाललेत वाद,तालुक्यातील जनता म्हणते कुणाकडे मागायची दाद नेत्यांमध्येच वाढत चाललेत वाद,तालुक्यातील जनता म्हणते कुणाकडे मागायची दाद Reviewed by Prashasak on एप्रिल १०, २०२३ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.