प्रशासक न्यूज,दि.१८मार्च
तृतीयपंथियासोबत झालेली ओळख एका तरुणाला चांगलीच महागात पडली आहे जबरदस्तीने पुण्याला नेऊन या तरुणाचे लिंग परिवर्तन केल्याची घटना जालना जिल्ह्यात घडली आहे
या प्रकरणात जालन्यातील कदीम पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तरुणाला पुण्यात नेऊन त्याच्यावर लिंगबदलाची शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेद्वारे या तरुणाला स्त्री बनवण्यात आलं.
पुण्याला नेऊन लिंग परिवर्तन
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, जालन्यात एका तरुणाचं जबरदस्तीनं लिंग परिवर्तन करण्यात आलं आहे. या प्रकरणात सात जणांविरोधात कदीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील कन्हैयानगर परिसरात वास्तव्यास असलेल्या एका तरुणाची तृतीय पंथीयांसोबत ओळख झाली होती. या तृतीयपंथीयांनी त्याला पुण्याला नेऊन जबरदस्तीनं त्याचं लिंग परिवर्तन केलं. लिंग परिवर्तन करून या तरुणाला स्त्री बनवण्यात आलं आहे
त्याचबरोबर त्याला रस्त्यावर भीक मागण्यास भाग पाडलं. हा लिंग परिवर्तन झालेला तरुण कुटुंबियांसोबत राहत असल्यानं त्याच्याकडे प्रति महिना दहा हजार रुपये खंडणी देखील मागण्यात आली. त्याने खंडणी देण्यास नकार दिल्यानं त्याला काही तृतीयपंथीयांनी रुग्णालयात जाऊन पुन्हा मारहाण केली. दरम्यान पीडित व्यक्तीच्या तक्रारीवरून संबंधित सात तृतीयपंथीयांविरोधात जालन्यातील कदीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धक्कादायक बातमी!तरुणासोबत घडल अस काही वाचून बसेल धक्का!
Reviewed by Prashasak
on
मार्च १८, २०२३
Rating:
Reviewed by Prashasak
on
मार्च १८, २०२३
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: