प्रशासक न्यूज,दि.22मार्च
सफाई कर्मचारी शहर स्वच्छ ठेवण्याचे काम प्रामाणिकपणे पार पाडत असतात परंतु काही नागरिकांची बेफिकीरी या सफाई कामगारांच्या जीवावर बेतू शकते त्यामुळे नागरिकांनी कचरा फेकताना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे
श्रीगोंदा शहरातील सफाई कर्मचारी संतोष बबन ससाणे हे नेहमी प्रमाणे नागरिकांनी जमा केलेला कचरा गोळा करून वाहनात भरत होते त्याच दरम्यान कुणीतरी बेपर्वा नागरिकाने ऍसिडची प्लास्टिक बाटली तिथे फेकून दिलेली होती कचरा गोळा करणारी गाडी या ऍसिडच्या बाटलीवरून मागेपुढे गेली आणि बाटली फुटून त्यातील ऍसिड कचरा गोळा करत असलेल्या ससाणे यांच्या अंगावर उडले
ससाणे यांनी डबल कपडे घातलेले असल्यामुळे अनर्थ टळला परंतु या ऍसिडमुळे त्यांच्या अंगाला चांगलेच भाजले आहे त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना तात्काळ उपचारासाठी दवाखान्यात नेले या दुर्घटनेत थोडक्यात ससाणे यांचा चेहेरा व डोळे बचावले अन्यथा मोठा अनर्थ घडला असता
त्यामुळे नागरिकांची बेफिकीरी या कर्मचाऱ्याच्या जीवावर बेतली असती म्हणून प्रत्येकाने कचरा देताना त्यात असल्या शरीरास घातक वस्तू कचऱ्यात जाणार नाहीत याची खबरदारी घेणे गरजेचे आहे
नागरिकांनो बेफिकीरी टाळा!सफाई कर्मचाऱ्या सोबत घडले असे---
Reviewed by Prashasak
on
मार्च २१, २०२३
Rating:
Reviewed by Prashasak
on
मार्च २१, २०२३
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: