श्रीगोंदा तालुक्यातील या गावात सुरू असलेल्या 'त्या' गोरखधंद्याचा पर्दाफाश


प्रशासक न्यूज,दि.१८मार्च

सर्व लोकांच्या जीवनातील अत्यावश्यक वस्तू म्हणजे दूध परंतु हे दूध खाण सुद्धा आता धोकेदायक झालं आहे त्याच कारण म्हणजे काही स्वार्थी लोक पैसे कमावण्याच्या नादात सर्वसामान्य लोकांच्या जीवाशी खेळत आहेत राज्यात सुरू असलेल्या दूध भेसळीचे लोण आता श्रीगोंदा तालुक्यात पोहोचले आहे

काष्टीत अश्याच प्रकारे केमिकलचा वापर करून सुरू असलेल्या दूध भेसळीच्या गोरख धंद्याचा अन्न व औषध प्रशासन विभागाने पर्दाफाश केला आहे

या कारवाईत 2520रु किंमतीची 21 किलो व्हे परमिट पावडर,3500रु किंमतीचे 35 किलो लाईट लिक्विड प्याराफीन,16030रु किंमतीचे 458 ली भेसळयुक्त गायीचे दूध असा मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला आहे
सदर दुधभेसळ प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी उमेश सूर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून बाळासाहेब बाबुराव पाचपुते रा काष्टी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

पाचपुते हे त्यांच्या गोठ्यात जप्त केलेल्या केमिकलचा वापर करून दुधात भेसळ करून लोकांची फसवणूक करत होते भेसळ करण्यासाठी वापरले जाणारे केमिकल हे मानवी शरीरास घातक आहे परंतु स्वतच्या आर्थिक फायद्यासाठी असे लोक नागरिकांच्या जीवाशी खेळत आहेत

श्रीगोंदा तालुक्यातील या गावात सुरू असलेल्या 'त्या' गोरखधंद्याचा पर्दाफाश श्रीगोंदा तालुक्यातील या गावात सुरू असलेल्या 'त्या' गोरखधंद्याचा पर्दाफाश Reviewed by Prashasak on मार्च १८, २०२३ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.