प्रशासक न्यूज,दि.२८मार्च
सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांची अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल राज्याचे माजी महसूल मंत्री व काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते नामदार बाळासाहेब थोरात यांचे शुभहस्ते शुक्रवारी 31 मार्च रोजी सकाळी साडेदहा वाजता सत्कार आयोजित करण्यात आला असल्याची माहिती तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रा. धर्मनाथ काकडे यांनी दिली.
प्रसिद्धी पत्रकात प्रा. काकडे यांनी म्हटले आहे की, सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांची नुकतीच अहमदनगर जिल्हा काँग्रेस पक्षाच्या प्रभारी अध्यक्षपदी निवड झाली असून को-जन असोसिएशन ऑफ इंडियाच्या संचालक पदी बिनविरोध निवड झालेली आहे. त्यानिमित्त नागवडे यांचा सत्कार शुक्रवार ता. 31 मार्च रोजी सकाळी साडेदहा वाजता प्रगती मंगल कार्यालय ढोकराई येथे राज्याचे माजी महसूल मंत्री तथा काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते नामदार बाळासाहेब थोरात यांचे शुभहस्ते आयोजित करण्यात आलेला आहे.
या सत्कार समारंभासाठी पुणे कसबा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित आमदार रमेश धंगेकर, श्रीरामपूरचे आमदार लहुजी कानडे, पुण्याचे माजी आमदार व ज्येष्ठ नेते मोहन जोशी, काँग्रेस पक्षाचे जिल्हा समन्वयक ज्ञानदेवराव वाफारे, जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सौ. अनुराधा नागवडे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे, जिल्हा बँकेचे माजी संचालक संपतराव म्हस्के, जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष स्मितल भैया वाबळे, यांच्यासह नगर जिल्हा काँग्रेस कार्यकारीनीचे व सर्व फ्रंटल चे पदाधिकारी महिला व युवक काँग्रेसचे पदाधिकारी तसेच जिल्हा व तालुक्यातील विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
श्रीगोंदा तालुका काँग्रेस कमिटीने आयोजित केलेल्या या सत्कार समारंभास तालुक्यातील सर्व पदाधिकारी, काँग्रेस कार्यकर्ते व नागवडे प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन तालुकाध्यक्ष प्रा. धर्मनाथ काकडे यांनी केले आहे.
माजी मंत्री व आमदारांच्या हस्ते होणार नागवडे यांचा सत्कार!
Reviewed by Prashasak
on
मार्च २८, २०२३
Rating:
Reviewed by Prashasak
on
मार्च २८, २०२३
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: