पांढऱ्या दुधाच्या काळ्या धंद्यात अनेकांचे हात बरबटलेले!


प्रशासक न्यूज,दि.२९मार्च 

दूध हे सर्वसामान्यांच्या जीवनातील एक अत्यावश्यक व अविभाज्य घटक अगदी लहान बाळापासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनाच दूध पिण्याचा सल्ला दिला जातो तसेच अनेक खाण्याचे पदार्थ बनवण्यासाठी दुधाचा वापर केला जातो त्यामुळे सर्वच स्तरातून दुधाला मागणी वाढत आहे

दुधाची हीच मागणी आणि त्यात मिळणारा पैसा विचारात घेऊन काही स्वार्थी लोक स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी दुधात भेसळ करून बक्कळ पैसा कमावत आहेत पण हा पैसा कामावण्याच्या नादात ते लोकांच्या जीवाशी खेळ करत आहेत याचा मात्र त्यांना विसर पडलेला दिसतो
हे प्रकरण फक्त भेसळीवर थांबलेले नाही तर आता ज्याच्याकडे गोठा नाही एकही दुधाचे जनावर नाही अश्या व्यक्ती सुद्धा व्हे परमिट पावडर आणि लाईट लिक्विड प्याराफिन या केमिकलं चा वापर करून कृत्रिम दूध तयार करत आहेत आणि ही बाब दूध पिणाऱ्या लोकांच्या जीवावर बेतू शकते

दि.१६मार्च रोजी श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी गावातील बाळासाहेब बाबुराव पाचपुते याच्या गोठ्यावर अन्न व औषध प्रशासन विभागाने छापा टाकत १६,०३०रु किंमतीचे ४५८लि गाईचे भेसळयुक्त दूध जप्त केले चोवीस तास उलटून गेल्यावर अन्न सुरक्षा अधिकारी उमेश सूर्यवंशी यांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशनला याबाबत फिर्याद दिली
त्यानंतर श्रीगोंदा पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली असता तालुक्यासह बाहेर जिल्ह्यातील अनेक लोकांचा यात सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून दूध भेसळ प्रकरणाची व्याप्ती व आरोपींची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे
श्रीगोंदा पोलिसांनी आत्तापर्यत एकूण २४ जणांणविरोधात गुन्हा दाखल केला आहे  त्यातील १०आरोपी अटक करण्यात पोलिसांना यश आलेले असून अजूनही १४आरोपी फरार आहेत पोलीस त्यांचा शोध घेत आहेत

गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे 
१) बाळासाहेब बाबुराव पाचपुते (फरार)
२) संदिप संभाजी मखरे,
३) वैभव रामदास राऊत,
४) दिपक विठठल मखरे
५) निलेश तुकाराम मखरे
६) संदीप बबन राऊत,
७) सतिष उर्फ आबा कन्हेरकर, रा.भानगाव,ता.श्रीगोंदा
(फरार)
८) महेश मखरे, रा.मखरेवाडी,ता.श्रीगोंदा (फरार)
९) शुभम बोडखे, रा. श्रीगोदा, ता.श्रीगोंदा (फरार)
१०) समिर शेख, रा. राहुरी,ता.राहुरी, जि.अहमदनगर (फरार)
११) कैलास बाबाजी लाळगे,रा.शिरुर, ता. शिरुर, जि. पुणे
१२) वैभव जयप्रकाश हांडे,रा.उमरज नं २, ता.
जुन्नर, जि. पुणे
१३) संजय तुकाराम मोहीते,रा.पारगाव, ता.
श्रीगोंदा, जि. अहमदनगर
१४) विशाल अशोक वागस्कर,रा.सुरोडी,
ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर
१५) अनिल काशीनाथ कुंदाडे,रा.भानगाव, ता.
श्रीगोंदा
१६) हेमंत टेके, रा. अकलुज,ता.माळशिरस,जि.सोलापुर (फरार)
१७) सविता वैभव हांडे, रा. उमरज नं २, ता. जुन्नर (फरार)
१८) हाजी अब्दुलाजी शेख, रा. अहमदनगर (फरार)
१९) शाकीर शेख, रा. राहुरी, ता. राहुरी (फरार)
२०) रामदास बबन नेटके, रा. केडगाव, ता.नगर (फरार)
२१) अजित संपत वागस्कर, रा.सुरोडी, ता. श्रीगोंदा (फरार)
२२) दिपक बापु वागस्कर, रा. सुरोडी, ता. श्रीगोंदा (फरार)
२३) दिपक मारुती करंजुळे, रा. पाडळी, ता. पारनेर (फरार)
२४) अतुल वसंत बारगुजे, रा.घोटवी, ता. श्रीगोंदा (फरार)
अश्या एकूण २४ जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग हे करत आहेत
पोलिसांनी तपासात आत्तापर्यत एक बिगर नंबरचा पांढऱ्या रंगाचा ४०७टेम्पो,एक स्विफ्ट डिझायर गाडी क्र एम एच १६,बी एच ९०६७,एक स्कॉर्पिओ क्र एम एच १६,बी वाय ३६९६,एक बोलेरो पिकअप गाडी क्र.एम एच १६,ए वाय ५८०३,एक एसीई एक्स कंपनीचे चारचाकी वाहन गाडी क्रं.एम एच १६,ए ई ३७८५,एक महिंद्रा कंपनीचे सुप्रो चारचाकी वाहन क्रं.एम एच १४,जे एल ४३५७ अशी एकूण २८ लाख रुपये किंमतीची ६ चारचाकी वाहने,३४,२२०रुपये किंमतीची ३०६किलो व्हे परमिट पावडर,११,०००रु किंमतीचे ११०ली लाईट लिक्विड प्याराफिन,१६०३०रु किंमतीचे ४५८ली गाईचे भेसळयुक्त दूध असा एकूण २८लाख ६१हजार २५०रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे

चौकट /-अन्न व औषध प्रशासन आतापर्यत अनभिज्ञ् कसे?
श्रीगोंदा शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणात दूध भेसळ व कृत्रिम पद्धतीने दूध तयार करण्याचा काळा उद्योग अनेक दिवसांपासून सुरु होता तरीसुद्धा अन्न व औषध प्रशासनाला एवढे दिवस याचा सुगावा कसा लागला नाही याबाबत संशय निर्माण झाला आहे अन्न व औषध प्रशासनाला या भेसळीच्या गोरख धंद्याबाबत खरच माहिती नव्हते कि आतापर्यत याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक सुरु होती याबाबत लोकांच्या मनात शंका निर्माण झाली आहे

चौकट/-गोठाच नाही तरी दररोज शेकडो लिटर दुधाची विक्री
अनेक जणांकडे घरी गोठाच नाही एकही जनावर नाही तरी हे लोक दररोज शेकडो लिटर कृत्रिम पद्धतीने बनावट दूध तयार करून ते डेअरीला विकत होते यावरून हा किती गंभीर प्रकार असून दूध भेसळीची व्याप्ती किती मोठी असेल याचा अंदाज येतोय

दुधात भेसळीसाठी वापरल्या जाणाऱ्या या केमिकलमुळे लोकांना कर्करोग,हाडांचे आजार होऊ शकतात असे तज्ञांचे  मत आहे त्यामुळे लोकांच्या जिवाशी खेळ करणाऱ्या या दूध माफियानावर कडक कारवाईची मागणी जोर धरत आहे 

पांढऱ्या दुधाच्या काळ्या धंद्यात अनेकांचे हात बरबटलेले! पांढऱ्या दुधाच्या काळ्या धंद्यात अनेकांचे हात बरबटलेले! Reviewed by Prashasak on मार्च २९, २०२३ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.