प्रशासक न्यूज,दि.२८मार्च
बेशिस्तपणे वाहन चालवणे,वाहतूकीचे नियम मोडणे,किंवा बेशिस्तपणे लावलेल्या वाहनांवर कारवाई करणे यासाठी पोलीस नेहमी सजग असतात किंवा अश्या बेजबाबदार वाहन चालकांवर कारवाई करणे हे पोलिसांचे कर्तव्य आहे परंतु श्रीगोंदा पोलीस स्टेशनच्या आवारातच अनेक खासगी वाहने बेशिस्तपणे लावली जात असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे पोलिसांची वाहने निघताना या अस्ताव्यस्त उभ्या असलेल्या वाहनांचा अडथळा निर्माण होतो तरीसुद्धा कुणीही यावर कारवाई करत नाही हे विशेष
पोलीस स्टेशनसमोरच बेदिक्कतपणे अशी बेशिस्त वाहने उभे करणाऱ्या लोकांना मात्र कुणाचाच धाक नसल्याचे दिसून येत आहे
तत्कालीन पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक वर्ष्यापासून धुळखात पडून असलेल्या पोलीस स्टेशनच्या आवारातील वाहानांचा निलाव करून पोलीस स्टेशन परिसराचा कायापालट केला होता पोलिसांची शासकीय वाहने तसेच पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांची वाहाने पार्क करता यावीत यासाठी चांगल नियोजन केले होते
कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त इतर कोणत्याही वाहनाला त्यावेळी पोलीस स्टेशन आवारात नो एन्ट्री होती
बेशिस्त वाहन पार्क करणाऱ्या लोकांवर कारवाईच्या माध्यमातून पोवार यांनी चांगली जरब बसवली होती
परंतु आता मात्र अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचारी देखील पोलीस स्टेशनच्या आवारात राजरोसपणे होत असलेल्या या बेशिस्त वाहन पार्किंगकडे डोळेझाक करत आहेत त्यामुळे अश्या वाहनचालकांवर कायद्याचा धाक राहिलेला दिसून येत नाही
*पोलीस स्टेशनं झालं पार्किंगच ठिकाण*
पोलिसांनी गुन्ह्यात जप्त केलेली वाहने कर्मचाऱ्यांची वाहने याव्यतिरिक्त खासगी कामानिमित्त आलेले लोकसूद्धा पोलीस स्टेशनच्या आवारात आपली वाहने आणून लावत आहेत त्यामुळे पोलीस स्टेशन परिसर वाहन पार्किंग केंद्र बनलय कि काय असे म्हणणे वावगे ठरणार नाही
त्यामुळे इतर वेळी नियमावर बोट ठेवून सामान्य लोकांवर कारवाई करणाऱ्या पोलिसांनी आतातरी पोलीस स्टेशन परिसरातील अश्या बेशिस्त वाहन पार्किंग करणाऱ्यांवर कारवाई करावी एवढीच जनतेची माफक अपेक्षा
बेशिस्त वाहन पार्किंगचा पोलिसांनाच बसतोय फटका
Reviewed by Prashasak
on
मार्च २८, २०२३
Rating:
Reviewed by Prashasak
on
मार्च २८, २०२३
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: