दौंड नगर रस्त्याने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी


प्रशासक न्यूज,दि.१७मार्च

दौंड नगर रस्त्याने आपण प्रवास करत असाल तर आपल्याला पोलिसांनी वाहतुकीत केलेला हा बदल माहीत असणे गरजेचे आहे

दौंड नगर या राष्ट्रीय महामार्ग क्र १६० वरील अनेक दिवसांपासून रखडलेल्या लोणीव्यंकनाथ रेल्वे गेट ते लोणीव्यंकनाथ गावापर्यंत रस्त्याचे मजबुतीकरण व काँक्रीटीकरण करायचे असल्यामुळे या मार्गावर सुरू असलेल्या वाहतुकीमुळे कामामध्ये अडथळा निर्माण होऊ नये अपघात होऊन कायदा दुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून या रस्त्यावरील वाहतूक दि.१७/०३/२०२३ रोजी सकाळी ०८.०० वाजल्या पासुन ते दि. २३/०३ / २०२३ रोजीचे सायंकाळी ६ वाजेपर्यत बंद असणार आहे सदरच्या कालावधीत अहमदनगर दौंड या महामार्गावरील पारगाव फाटा ते ढोकराई फाटा ही वाहतूक बंद करून ती पारगाव सुद्रीक फाटा-पारगाव सुद्रीक-श्रीगोंदा बायपास- ढोकराई फाटा / काष्टी या मार्गाने वळविण्यात आली आहे.

तर दौंड कडुन अहमदनगर कडे येणारी सर्व प्रकारची वाहतुक काष्टी / ढोकराई फाटा - श्रीगोंदा बायपास- पारगाव सुद्रीक- पारगाव फाटामार्गे अहमदनगर या मार्गाने वळविण्यात आली आहे तरी सर्व वाहनचालकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे

अ नगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम३३(१)(ब) नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन पारगाव सुद्रीक फाटा ते ढोकराई फाटा या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतुक पर्यायी मार्गाने वळविणेबाबतचे आदेश जारी केला आहे

वाहतुक बदल केलेबाबत संबंधित विभागाकडुन योग्य त्या ठिकाणी मार्गदर्शनपर फलक व ब्यारिकेटिंग करण्याबाबत देखील सूचना केली आहे

ऍम्ब्युलन्स, शासकीय वाहने,सदर रस्ता दुरुस्तीच्या अनुषंगाने आवश्यक असणारी वाहने व स्थानिक प्रशासनाने परवानगी दिलेले वाहने यांना हा आदेश लागू राहणार नाही

दौंड नगर रस्त्याने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी दौंड नगर रस्त्याने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी Reviewed by Prashasak on मार्च १७, २०२३ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.