आता घरच्या घरी वजन कमी करा काय आहे फंडा


प्रशासक न्यूज,दि.१७मार्च

वजनवाढ ही आजकाल प्रत्येकाला भेडसावणारी समस्या वाढलेले वजन कमी करण्यासाठी माणूस वाट्टेल ते करायला तयार असतो वजन कमी करण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागते त्यासाठी आहारावर नियंत्रण दररोज व्यायाम करणे गरजेचे आहे

मग तो चालणे,पोहणे,सायकलिंग,जिम असा कोणताही व्यायाम असो परंतु अनेकांना सकाळी उठून असा व्यायाम करण्याचा प्रचंड कंटाळा असतो

पण आज आम्ही तुम्हाला असं एक वर्कआऊट सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्ही जीममध्ये न जाताही वर्कआऊट करू शकता. यामध्ये तुम्हाला घरातील काही काम करावी लागणार आहेत. तुम्हाला आता आश्चर्य वाटेल. मात्र घरातील काम केल्याने देखील तुम्हाला प्रॉपर वर्कआऊटचा रिझल्ट मिळू शकणार आहे. पाहुयात यासाठी कोणती घरातील कामं करावी लागतील.
*पीठ मळणं*
अनेकांनी चपाती किंवा भाकरीचं पीठ मळायचा कंटाळा येतो. काहींना हे काम फार बोरिंग देखील वाटतं. मात्र हे तुमच्या फीटनेससाठी उपयुक्त ठरतं. पीठ मळल्याने हातांची एक्सरसाईज होण्यास मदत होते.
*बागकाम*
बागकाम करताना तुमचं कार्डियोवैस्कुलर एक्सरसाइज होते. यावेळी अधिक मेहनत घेतली तक तुमच्या शरीराचं संपूर्ण वर्कआऊट होण्यास मदत होते. हे काम करतेवेळी स्ट्रैचिंग, वेटलिफ्टिंग आपोपाप होऊन जातं. याशिवाय बागकाम करताना आपण चालतो, त्यामुळे फॅट बर्न होण्यास मदत होते.
*हातांनी कपडे धुणं*
ज्यावेळी तुम्ही हातांच्या सहाय्याने कपडे धुता, त्यावेळी तुमच्या शरीराचं पूर्णपणे वर्कआऊट होतं. यावेळी बादली उचताना तसंच कपडे धुताना हातांच्या होणाऱ्या हालचालींमुळे तुमचं एक्सरसाईज होते. यावेळी तुम्ही करत असलेल्या शारीरिक हालचालींमुळे फॅट बर्न होण्यास मदत होते.
*लादी पुसणं*
केर काढणं किंवा लादी पुसणं हे काम करायला अनेकांना आवडत नाही. पण हा एक अतिशय उपयुक्त व्यायाम आहे. लादी पुसणं हा पायांसाठी एक उत्तम व्यायाम मानला जातो. यासोबत हातांचीही एक्सरसाईज होते. या कामामुळे खास करून बेली फॅट कमी होण्यास मदत होते.
आता घरच्या घरी वजन कमी करा काय आहे फंडा आता घरच्या घरी वजन कमी करा काय आहे फंडा Reviewed by Prashasak on मार्च १७, २०२३ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.