प्रशासक न्यूज,दि.१७मार्च
आपल्या धमाकेदार ऑफर्स,इतर कंपन्यांपेक्षा हटके प्लॅन,कमी किमतीत रिचार्ज अश्या एक ना अनेक कारणांसाठी प्रसिद्ध असलेल्या Jio ने नवीन रिचार्ज प्लॅन लॉन्च केले आहेत जे फॅमिली पॅकसह उपलब्ध केला आहे.
जर तुम्हाला चार लोकांसाठी एकच प्लॅन हवा असेल तर Jio चा नवीन रिचार्ज तुमच्यासाठी सोयीस्कर ठरणार आहे. यामध्ये Jio Plus पोस्टपेड प्लॅन जारी केला असून ज्यांची किंमत फक्त 399 रुपये आहे. या प्लॅनमध्ये तुम्ही इतर तीन यूजर्स देखील जोडू शकता. म्हणजेच एका रिचार्जमध्ये चार लोकांचे रिचार्ज करू शकतात. त्यामध्ये मग तुमच्या कुटूंबाचे सदस्य असो किंवा मित्र-मैत्रीणी असो तुम्ही स्वता: सह चार जणांना रिचार्ज करू शकता.
4 लोकांसह Jio चा पोस्टपेड प्लान आधीच अस्तित्वात असला तरी त्याची किंमत जास्त आहे. त्याच वेळी, या रिचार्ज प्लॅनमध्ये, वापरकर्त्यांना त्यांच्या आवडीनुसार कनेक्शन निवडण्याचे स्वातंत्र्य देखील मिळते. म्हणजेच, वापरकर्ते दोन, तीन किंवा चार कनेक्शन जोडू शकतात. त्यानुसार त्यांना किंमत मोजावी लागेल. Jio ने 299 रुपये, 399 रुपये, 599 रुपये आणि 699 रुपये किंमतीचे चार नवीन प्लान लॉन्च केले आहेत. हे सर्व प्लॅन 22 मार्चपासून ग्राहकांसाठी उपलब्ध होतील. या प्लॅनमध्ये नेमका काय फायदा मिळू शकतो याबद्दल जाणून घेऊया...
*काय फायदा होईल?*
Jio चा नवीन प्लॅन 299 रुपयांपासून सुरू होत आहे. ज्यामध्ये वापरकर्त्यांना अमर्यादित कॉलिंग, 30GB डेटा, अमर्यादित SMS सारख्या सुविधा मिळतात. तर 599 रुपयांचा प्लॅनमध्ये यूजर्सना अनलिमिटेड व्हॉईस, डेटा आणि SMSची सुविधा मिळते. तुम्ही या योजनेची मोफत चाचणी देखील घेऊ शकता. वापरकर्त्यांना एक महिना विनामूल्य चाचणी मिळेल.
फॅमिली प्लॅनमध्ये काय ऑफर आहे?
399 रुपयांच्या नवीन प्लॅनमध्ये यूजर्सना अमर्यादित कॉलिंगसह 75GB डेटा, अमर्यादित एसएमएस आणि तीन कनेक्शन अॅड-ऑनची सुविधा मिळते. लक्षात ठेवा की प्रत्येक कनेक्शन अॅड-ऑनसाठी तुम्हाला अतिरिक्त 99 रुपये मोजावे लागतील. तुम्ही त्याची मोफत चाचणी देखील वापरू शकता.
तर 699 रुपयांच्या पोस्टपेड प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना अमर्यादित कॉलिंग, 100GB डेटा आणि अमर्यादित एसएमएस सुविधा मिळते. यामध्ये यूजर्सना नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम सारख्या अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शनही मिळेल. तुम्ही Jio च्या या प्लॅनमध्ये 3 अतिरिक्त कनेक्शन देखील जोडू शकता.
जर तुम्ही नवीन ग्राहक असल्यास तर सिम सक्रिय करण्यासाठी 99 रुपये आकारले जातील. याशिवाय तुम्हाला 500 रुपये सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून भरावे लागतील. तथापि, कंपनी Jio Fiber वापरकर्ते, कॉर्पोरेट कर्मचारी, विद्यमान नॉन-जिओ पोस्टपेड वापरकर्ते आणि काही इतरांसाठी सुरक्षा ठेव माफ करत आहे.

एकाच रिचार्जमध्ये चालवा चार मोबाईल, सोबत Amazon-Netflix फ्री
Reviewed by Prashasak
on
मार्च १७, २०२३
Rating:
Reviewed by Prashasak
on
मार्च १७, २०२३
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: