पोलीस ठाण्याच्या आवारातच दोन तरुणांना जबर मारहाण


प्रशासक न्यूज,दि.२४जानेवारी

श्रीगोंदा पोलीस स्टेशनच्या आवारातच आज दुपारी दोन तरुणांना जबर मारहाण करण्यात आली पोलीस स्टेशनच्या समोर हा गोंधळ सुरू असताना पोलिसांनी मात्र काहीकाळ बघ्याचीच भूमिका घेतली हे विशेष

याबाबत समजलेली माहिती अशी की,आज सकाळी शहरातील दोन तरुणांमध्ये दुचाकीला कट मारण्याच्या कारणातून वाद झाला यात एका तरुणाला मारहाण झाली त्यानंतर मारहाण झालेल्या तरुणाच्या गटाने दुसऱ्या तरुणाला बस स्थानक परिसरात जाऊन जबर मारहाण केली त्यानंतर दोन्ही गटाचे नेते काही नगरसेवक व तरुण असा मोठा जमाव पोलीस स्टेशनसमोर जमा झाला त्याठिकाणी दोन्ही बाजूने या वादावर पडदा टाकण्याचे ठरले वाद मिटवण्याचे ठरलेले असतानाच पोलीस स्टेशन समोर उभ्या असलेल्या दुसऱ्या गटाच्या काही तरुणांनी बाहेर आलेल्या दोघा तरुणांवर अचानक हल्ला चढवला हल्ला झाल्यामुळे हे तरुण जवळ असलेल्या एका सेतुत घुसले तरी दुसऱ्या गटाच्या तरुणांनी तिथं घुसून या दोघांना जबर मारहाण केली या मारहाणीत दोन्ही तरुण गंभीर जखमी झाले आहेत या प्रकरणी अद्याप दोन्ही गटाकडून कोणतीही तक्रार नोंदवण्यात आलेली नाही
गर्दी पांगवण्याची तसदी नाही
वाद झाल्यानंतर प्रकरण मिटवण्यासाठी दोन्ही गटाचे तरुण मोठ्या संख्येने पोलीस स्टेशनला जमा झाले होते मोठी गर्दी पोलीस स्टेशनमध्ये झालेली असताना सुद्धा पोलिसांनी हा जमाव पांगवण्याची खबरदारी घेतली नाही प्रसंगावधान राखत पोलिसांनी वेळीच गर्दी पंगवली असती तर त्याठिकाणी वाद टळला असता अशी परिसरात चर्चा होती

एकच धावपळ,गोंधळ आणि दहशत
भरदुपारी पोलीस स्टेशन परिसरात गर्दीच्या ठिकाणी तरुणांवर झालेल्या हल्ल्याने त्याठिकाणी एकच गोंधळ उडाला कामानिमित्त आलेल्या लोकांची चांगलीच धांदल उडाली परिसरात दहशत पसरली होती पोलीस स्टेशनसमोरच अशी मारहाणीची घटना झाल्यामुळे शहरात पोलिसांचा धाक उरला आहे की नाही अशी लोक चर्चा करत होते
आधी बघ्याची भूमिका,मग लाठीचार्ज
पोलीस स्टेशन बाहेर तरुणांना मारहाण सुरू असताना मोठा गोंधळ उडाला तेव्हा पोलिसांनी मात्र आधी बघ्याची भूमिका घेतली परंतु वाद मिटवण्यासाठी आलेल्या नेत्यांनी पोलीसांना मारहाण सुरू असलेल्या ठिकाणी जाण्यास सांगितले तेव्हा पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन लाठीचार्ज करत जमाव पांगवला

दुचाकीला कट मारण्याच्या किरकोळ वादातून दोन गट भिडले त्याचे पर्यवसन जबर मारहाणीत झाले यातून शहरात दोन गटात तणाव निर्माण झाला आहे सध्या तणावपूर्ण शांतता आहे या प्रकरणात पोलीस काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे



पोलीस ठाण्याच्या आवारातच दोन तरुणांना जबर मारहाण पोलीस ठाण्याच्या आवारातच दोन तरुणांना जबर मारहाण Reviewed by Prashasak on जानेवारी २४, २०२३ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.