एकाच कुटुंबातील सात जणांचे मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ!!


प्रशासक न्यूज,दि.२४जानेवारी

सासू-सासरे, जावई-मुलगी आणि तीन नातवंडे असे एकाच कुटुंबातील सात जणांचे मृतदेह आढळून आल्यामुळे दौंड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे अंगावर शहारे आणणारी ही घटना तालुक्यातील पारगाव हद्दीत भिमानदीपात्रात घडली आहे. हे कुटुंबीय मूळचे बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील असून ते मजुरीसाठी नगर जिल्ह्याच्या पारनेर तालुक्यातील निघोज येथे आले होते.
मोहन उत्तम पवार (वय ४५), त्यांची पत्नी संगीता ऊर्फ शहाबाई मोहन पवार (वय ४०, दोघेही रा. खामगाव, ता. गेवराई, जि. बीड), श्याम पंडीत फुलवरे (वय २८ जावई), राणी श्याम फुलवरे (वय २४ मुलगी), रितेश ऊर्फ भैया श्याम फुलवरे (वय ०७), छोटू श्याम फुलवरे (वय ०५), कृष्णा श्याम फुलवरे (वय ०३, सर्व रा. हातोला, ता. वाशी, जि. उस्मानाबाद) अशी मृतदेह सापडलेल्या व्यक्तींची नावे आहेत.अशी माहिती पोलिसांकडून समजली

पवार पती-पत्नी हे बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील खामगाव येथील मूळचे आहेत. त्यांचे जावई श्याम फुलवरे व त्यांचे कुटुंबीय हे उस्मानाबाद जिल्ह्यातील आहेत. ते मजुरीसाठी निघोज येथे आले होते. त्या ठिकाणी एका वर्षापासून ते मोलमजुरीचे काम करत होते. या सर्वांचे मृतदेह आज आढळून आले
पोलिसांच्या माहितीनुसार, पवार आणि फुलवरे कुटुंबीय हे वर्षभरापूर्वी निघोजमध्ये कामासाठी आले हेाते. हे सर्वजण निघोजमध्ये राहत होते. मात्र, पारगाव हद्दीतील भीमा नदीपात्रात १८ जानेवारी एका महिलेचा मृतदेह आढळला. त्यानंतर २० जानेवारी रोजी एका पुरुषाचा, ता. २१ जानेवारी रोजी पुन्हा एका महिलेचा मृतदेह, तर २२ जानेवारी पुन्हा एका पुरुषाचा मृतदेह आढळून आला

दरम्यान, पारगाव हद्दीत भीमा नदीत वरील चार मृतदेह आढळून आले, त्याच्या आसपासच आज (ता. २४ जानेवारी) पुन्हा तीन लहान मुलांचे मृतदेह आढळून आले.यातील एका महिलेच्या मृतदेहाजवळ आढळून आलेल्या मोबाईलवरून नातेवाईकांशी संपर्क साधून सर्व मृतदेहांची ओळख पटविण्यात आली आहे.
एकाच कुटुंबातील सात जणांचे मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ!! एकाच कुटुंबातील सात जणांचे मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ!! Reviewed by Prashasak on जानेवारी २४, २०२३ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.