प्रशासक न्यूज,दि.२३जानेवारी
कानून के हाथ लंबे होते हे असा डायलॉग आपण नेहमी चित्रपटात ऐकतो पण त्याची प्रचिती श्रीगोंदा पोलिसांनी केलेल्या एका कारवाई वरून दिसून आली आहे
सुमारे दोन वर्ष्यापूर्वी आपल्या मालकाचा विश्वास संपादन करून त्याची डिस्कव्हर कंपनीची दुचाकी व एक मोबाईल असा मुद्देमाल चोरून राजू उर्फ अंकुश उमाजी चव्हाण या नोकराने पोबारा केला होता त्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना दोन वर्ष्यानी यश आलं आहे
या चोरीबाबत दि ३/०२/२०२१ रोजी सचिन सदाशिव राहिंज रा राहिंजवाडी,काष्टी यांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशनला फिर्याद दिली होती त्यावरून पोलिसांनी सदर नोकरा विरोधात श्रीगोंदा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला होतात्यानंतर पोलिसांनी सदर आरोपीच्या मूळगावी ढवळकेवाडी,ता.गंगाखेड,जि. परभणी याठिकाणी जाऊन वेळोवेळी शोध घेतला पण आरोपी मिळून येत नव्हता पोलिसांनी या आरोपीला पकडण्यासाठी त्या गावात आपला एक गुप्त बातमीदार तयार केला आणि त्याच्या मार्फत या आरोपीची माहिती घेण्यास सुरुवात केली सदर आरोपी हा मूळगावी आल्याबाबत त्या गुप्त बातमीदाराने पोलिसांना माहिती दिली त्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी पो ना मोरे व पो कॉ साखरे यांना तपासकमी पाठवले आरोपीचा शोध घेत असताना त्याच्या मोबाईल लोकेशनच्या आधारे त्याला परळीवैजनाथ रेल्वेस्टेशन इथून ताब्यात घेतलेआरोपीकडून चोरी केलेली १००सीसी डिस्कवर दुचाकी जप्त केली आहे सदर आरोपी पोलीस कस्टडी मध्ये आहे
चोरी करणारा तो नोकर दोन वर्ष्यानी गजाआड!
Reviewed by Prashasak
on
जानेवारी २३, २०२३
Rating:
Reviewed by Prashasak
on
जानेवारी २३, २०२३
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: