श्रीगोंदयाच्या शैक्षणिक क्षेत्रात मानाचा तुरा;आंतरराष्ट्रीय स्कुल होणार सुरू


प्रशासक न्यूज,दि.२३जानेवारी

श्रीगोंदा तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात मोठी प्रगती होत असून शहरातील वडाळी रोडवर लवकरच आंतराष्ट्रीय व्यंकटेश पोदार लर्न स्कुल सुरू होत असून पुणे मुंबईसारख्या शहरात नावाजलेले स्कुल श्रीगोंदयात सुरू होत असल्यामुळे शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला जाणार आहे
या स्कुलच्या विद्यार्थी प्रवेश कार्यालयाचे उदघाटन काल दि २२ रोजी रविवारी सायंकाळी रिव्हर पार्क येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले
वडाळी रस्त्यावर या स्कुलच्या अद्यावत इमारतीचे काम अंतिम टप्प्यात आले असून पहिल्या वर्षी प्ले ग्रुप ते सहावी पर्यंत सी.बी.एस.सी.प्याटर्न अंतर्गत वर्ग सुरू करण्यात येणार असल्याची माहिती स्कुलच्या व्यवस्थापकीय मंडळाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली या पत्रकार परिषदेसाठी तिरुपती चॅरिटेबल फाउंडेशनचे अध्यक्ष नवनीत मुनोत,उपाध्यक्ष अतुल बगाडे,सचिव योगेश मूथा,खजिनदार राहुल कोठारी,विश्वस्त सुनीलकुमार मुनोत,अमित बगाडे,हितेश मूथा,अभय कोठारी,महेश मूथा,डॉ अनुप बगाडे,निलेश मुनोत,आदेश मुनोत,किरण कोठारी हे विश्वस्त मंडळ उपस्थित होते

यावेळी स्कुलविषयी महिती देताना सुमारे सहाशे विद्यार्थ्यांची आसनव्यवस्था असलेल्या २७ वर्गखोल्या,संगणक प्रशिक्षण कक्ष तसेच खेळाचे मैदान तयार करण्यात आले आहे अशी माहिती नवनीत शेठ मुनोत,राहुलशेठ कोठारी,व डॉ अनुप बागडे यांनी दिली
या शाळेत कोणतेही अतिरिक्त शुल्क न घेता माफक दरात विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची दारे खुली करून दिली जातील असे सांगतानाच पोदार म्यानेजमेंट नुसार तज्ञ शिक्षक इतर कर्मचारी वर्ग नेमण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे विश्वस्त मंडळाने यावेळी सांगितलें पोदार सारखे नावाजलेले स्कुल श्रीगोंदयात सुरू होत असल्यामुळे ग्रामीण भागातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळणार आहे
श्रीगोंदयाच्या शैक्षणिक क्षेत्रात मानाचा तुरा;आंतरराष्ट्रीय स्कुल होणार सुरू श्रीगोंदयाच्या शैक्षणिक क्षेत्रात मानाचा तुरा;आंतरराष्ट्रीय स्कुल होणार सुरू Reviewed by Prashasak on जानेवारी २३, २०२३ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.