मी आमदार म्हणून समाधानी!माणस जोडण्याचा मला छंद


प्रशासक न्यूज,दि.१२जानेवारी

मी आमदार म्हणून समाधानी आहे मला पारनेर तालुक्यातच राहू द्या माझ्या मनात काहीही शिजत नाही मी जिल्ह्यात जिल्ह्याबाहेर सगळीकडे फिरतो कुठल्याही माणसाला मी मदत करतो नवीन माणस जोडण्याचा मला छंद आहे असं मत पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी व्यक्त केले श्रीगोंदा तालुका निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या पत्रकारांच्या सन्मान सोहळ्यात लंके बोलत होते या कार्यक्रमासाठी जेष्ठ नेते बाबासाहेब भोस, निलेश लंके प्रतिष्ठान श्रीगोंदा तालुका अध्यक्ष सुभान तांबोळी,अजय शेळके,प्रा लाकुडझोडे,विजय मचे यांच्यासह तालुक्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते

पत्रकार दिनाचे औचित्य साधून लंके प्रतिष्ठान च्या वतीने आज श्रीगोंदा तालुक्यातील पत्रकारांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता यावेळी जेष्ठ पत्रकार उत्तम राऊत,मीरा शिंदे,संजय काटे,शकील शेख,दत्ताजी जगताप यांनी तालुक्यातील पत्रकारांच्या समस्या यावेळी मांडत शहरात पत्रकार भवन व पत्रकार वसाहत उभी रहावी यासाठी आ लंके यांनी लक्ष घालण्याची मागणी केली

तसेच आमदार लंके यांनी श्रीगोंदा तालुक्यात येण जाण वाढवलं असून त्यांच्या मनात काहीतरी शिजत असल्याचे सांगून आ लंके यांना खासदारकीचे वेध लागल्याचे मत काही पत्रकारांनी व्यक्त केले

त्यावर उत्तर देताना लंके यांनी मला पारनेर तालुक्यातच राहू द्या मी आमदार होण्याआधीपासून श्रीगोंदा तालुक्यात येतो कोणत्याही कार्यक्रमाला उपस्थित राहतो यात कोणतेही राजकारण आपल्या डोक्यात नाही राजकारण ठरवून घडत नसत आपण किती संपत्ती कमावली यापेक्षा किती माणसे कमावली हे महत्वाचे असते असे मत आमदार निलेश लंके यांनी यावेळी व्यक्त करत लोकसभा लढवण्याच्या चर्चेला सध्या तरी पूर्णविराम दिला

नगर जिल्ह्यातील पत्रकारांची मूल नगरमध्ये गेल्यावर जर त्यांना हॉस्टेलची अडचण आली तर त्यांची राहण्याची व्यवस्था होईल अशा प्रकारचे भव्यदिव्य पत्रकार भवन नगर येथे उभारण्याबाबत मी प्रयत्नशील आहे तसेच श्रीगोंदयात देखील पत्रकार भवन उभे राहण्यासाठी आपण पाठपुरावा करू असे देखील लंके यांनी यावेळी सांगितले

त्यानंतर बोलताना जेष्ठ नेते बाबासाहेब भोस यांनी तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान करता आला नाही याबाबत दिलगिरी व्यक्त करून मला यापुढे कोणतीही निवडणूक लढायची नाही त्यामुळे इतर नेत्यांकडून मी काम करून घेऊ शकतो त्यांना कामाला लावून पत्रकार भावनासाठी लवकरच जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले

यावेळी आभार मानताना पत्रकार अंकुश शिंदे यांनी निलेश लंके पारनेरचे आमदार असून श्रीगोंदयातील पत्रकारांचा त्यांनी सन्मान केला पण तालुक्यातील आमदार व काही नेत्यांना पत्रकारांचा विसर पडला याबाबत सर्व पत्रकारांच्या वतीने खंत व्यक्त केली
मी आमदार म्हणून समाधानी!माणस जोडण्याचा मला छंद मी आमदार म्हणून समाधानी!माणस जोडण्याचा मला छंद Reviewed by Prashasak on जानेवारी १२, २०२३ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.