श्रीगोंद्यात काँग्रेसला भगदाड!'त्या' सहा नगरसेवकांचा काँग्रेसला हात दाखवत भगव्याला साथ


प्रशासक न्यूज,दि.४जानेवारी

 श्रीगोंदा नगरपरिषदेच्या एकूण सहा नगरसेवकांनी काल दि.३रोजी मुंबई येथे काँग्रेसला अखेर जय महाराष्ट्र् केला काँग्रेसचा हात सोडून त्या हातात आता त्यांनी भगवा घेतला आहे या सर्व सहा जणांनी काल खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना(शिंदे गटात)प्रवेश केला त्यामुळे  श्रीगोंदयात काँग्रेसला मोठे भगदाड पडले आहे विशेष म्हणजे प्रवेश करणाऱ्या नगरसेवकांमध्ये राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते बाबासाहेब भोस यांचे चिरंजीव काँग्रेसचे गटनेते गणेश भोस व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे कट्टर समर्थक समीर बोरा यांचा देखील समावेश आहे तर राजेंद्र नागवडे यांचे जवळचे विश्वासू प्रशांत गोरे यांनी देखील काल शिंदे गटात प्रवेश केला आहे
शिंदे गटात प्रवेश केलेले काँग्रेसचे नगरसेवक १)संतोष कोथिंबीरे,२)निसार बेपारी,३)गणेश भोस,४)सोनाली घोडके,५)सीमा गोरे,६)समीर बोरा

शहराच्या विकासासाठी आम्ही सर्वांनी शिंदे गटात प्रवेश केल्याचे मत काँग्रेसच्या बंडखोर नगरसेवकांनी व्यक्त केले काही दिवसातच श्रीगोंदा शहराच्या विकासासाठी भरघोस निधी देण्याचे आश्वासन खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी या नगरसेवकांना दिले
या प्रवेशावेळी शिवसेना शिंदे गट अ नगर जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे, जिल्हा संपर्कप्रमुख सचिन जाधव,नगरशहरप्रमुख दिलीप सातपुते,जिल्हा उपप्रमुख संतोष शिंदे,श्रीगोंदा तालुकाप्रमुख नंदकुमार ताडे हे उपस्थित होते

*नगराध्यक्षा अविश्वास ठराव प्रकरणाकडे लक्ष*
श्रीगोंदा नगरपरिषदेच्या सहा नगरसेवकांनी काल शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे काँग्रेसला खिंडार पडले असून श्रीगोंदयात शिंदे गटाची ताकद वाढली आहे या प्रवेशामुळे आता काँग्रेस च्या नगराध्यक्षा शुभांगी पोटे यांच्यावरील अविश्वास ठराव प्रकरणाचा निकाल काय येतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या प्रकरणी निर्णय देणार असून या महिन्यात त्या प्रकरणाचा निर्णय होण्याची श्यक्यता व्यक्त होत आहे

श्रीगोंद्यात काँग्रेसला भगदाड!'त्या' सहा नगरसेवकांचा काँग्रेसला हात दाखवत भगव्याला साथ श्रीगोंद्यात काँग्रेसला भगदाड!'त्या' सहा नगरसेवकांचा काँग्रेसला हात दाखवत भगव्याला साथ Reviewed by Prashasak on जानेवारी ०३, २०२३ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.