विरुद्ध दिशेने येणाऱ्या तरुणाने घेतला एकाचा बळी


प्रशासक टीम,दि.२०डिसेंबर

अलीकडे अपघातांचे प्रमाण वाढले आहे वाहानचालकांकडून वाहतुकीचे नियम पायदळी तुडवत आहेत त्यामुळे अनेकांचा नाहक जीव जात आहे

अश्याच चुकीच्या दिशेने येणाऱ्या एका तरुणाने एका ६५वर्षीय इसमाचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना श्रीगोंदा शहरानजीक श्रीगोंदा पारगाव रस्त्यावर आज सकाळी साडेसहा च्या सुमारास घडली आहे पारगाव येथील तरुणाने विरुद्ध दिशेने येऊन धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात जलसंपदा विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी वसंत भोसले रा शिवपार्वती सोसायटी,श्रीगोंदा यांचा मृत्यू झाला आहे आमदार बबनराव पाचपुते यांचे स्वीय सहायक योगेश भोसले यांचे ते वडील होते

या अपघाताबाबत समजलेली माहिती अशी की,आज सकाळी सहा वाजता भोसले हे पत्नीसह दुचाकीवरून पारगाव कडे निघाले होते ते शौर्य अकॅडमीच्या नजीक गेले असता पारगाव कडून श्रीगोंद्याला एक तरुण जिम ला जाण्यासाठी जोरात दुचाकीवरून येत होता त्याचवेळी त्याने विरुद्ध दिशेने दुचाकी वळवली आणि तो श्रीगोंदयकडून येणाऱ्या भोसले यांच्या दुचाकीला जोरात धडकला या अपघातात भोसले यांच्या डोक्याला मार लागला त्यांना उपचारासाठी काही नागरिकांनी श्रीगोंदयात नेले परंतु तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता तर भोसले यांच्या पत्नीच्या डोक्याला,हाताला व पायाला दुखापत झाली आहे

घटनेनंतर माहिती समजल्यानंतर पो ना भरत खारतोडे व नय्युम पठाण यांनी पंचनामा केला सदर अपघाताबाबत परिसरात हळहळ व्यक्त होत आहे

रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अपघातांमध्ये वाढ
श्रीगोंदा पारगाव रस्ता नुकताच दुरुस्त केला असला तरी याठिकाणी रस्त्यावर अनेक ठिकाणी बारीक खडीची कच पडलेली आहे त्यामुळे याठिकाणी अनेक दुचाकी घसरतात संबंधीत ठेकेदाराने याबाबत तात्काळ सुधारणा करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे
विरुद्ध दिशेने येणाऱ्या तरुणाने घेतला एकाचा बळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या तरुणाने घेतला एकाचा बळी Reviewed by Prashasak on डिसेंबर १९, २०२२ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.