प्रशासक न्यूज,दि.१५डिसेंबर
महापुरुषांचा सतत होणारा अपमान त्यांच्याबद्दल सरकारमधील मंत्री व आमदारांकडून होणारी बेताल वक्तव्य याचा निषेध व्यक्त करण्यासाठी येत्या २१डिसेंबर बुधवारी श्रीगोंदा शहर बंद ठेवण्याचा निर्णय आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला श्रीगोंदा शहर बंद ठेण्यासोबतच तालुक्यातील लोनिव्यंकनाथ व मढेवडगाव ही गावे देखील बंद ठेवण्यात येणार असल्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला शहर बंद सोबतच या दिवशी सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिलीछत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा फुले, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, महामानव राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांनी बहुजन समाजासाठी मोठे योगदान दिले आहे पण राज्यातील काही जबाबदार मंडळी या राष्ट्र पुरूषांबद्दल बेताल वक्तव्य करत आहेत असे असताना या बेताल वक्तव्य करणाऱ्यांविरोधात कुठलीही कारवाई न करता सरकार फक्त बघ्याची भूमिका घेत आहे याच्या निषेधार्थ बुधवार दिनांक २१ डिसेंबर रोजी श्रीगोंदा शहर कडकडीत बंद ठेवण्याबाबत व सर्वपक्षीय मोर्चा काढण्याच्या नियोजनासाठी आज गुरुवार दि-१५ रोजी दुपारी वृद्धेश्वर पतसंस्था हॉल मध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीसाठी नगरसेवक गणेश भोस,समीर बोरा,प्रशांत गोरे,निसार बेपारी,सतीश मखरे,मोहन भिंताडे,राष्ट्रवादी कॉग्रेस चे अजीम भाई जकाते यांच्यासह सर्व पक्षाचे पदाधिकारी,संघटनेचे प्रमुख, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सतीश शेठ बोरा यांनी सर्व व्यापारी बुधवारी 21 तारखेला आपली दुकाने बंद ठेवून सहकार्य करतील असे आश्वासन दिले.
कृषी उत्पन्न बाजार समिती मा.सभापती बाळासाहेब नाहाटा म्हणाले महापुरुषांच्या अस्मिता जपण्यासाठी मी तन, मन ,धनाने योगदान देणार आहे २१ तारखेला मी ज्या लोणी गावचे प्रतिनिधित्व करतो ते गाव बंद ठेवुन मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी होऊ अशी गवाही यावेळी त्यांनी दिली.
कॉग्रेस पक्षाचे युवक जिल्हा अध्यक्ष स्मितल भैया वाबळे यांनी मढे वडगाव बंद ठेवणार असून सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने मोर्चा त सहभागी होणार असल्याचे सांगितले.
नागवडे सह.साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांचे प्रतिनिधी म्हणून प्रशांत दरेकर उपस्थित होते त्यांनी राजेंद्र नागवडे यांनी मोर्चा ला आर्थिक मदत जाहीर केल्याचे सांगून या बंद व मोर्चात सक्रिय सहभाग घेणार असल्याचे सांगितले.
शिवसेनेचे(ठाकरे गट) बाळासाहेब दूतारे यांनी मोर्चा व बंद मध्ये संपूर्ण तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचे सांगितले.
'त्या' प्रकरणाच्या निषेधार्थ श्रीगोंदा शहर बंदचा निर्णय
Reviewed by Prashasak
on
डिसेंबर १५, २०२२
Rating:
Reviewed by Prashasak
on
डिसेंबर १५, २०२२
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: