श्रीगोंदयाचा विद्यार्थी राष्ट्रीय पातळीवर करणार राज्याचे प्रतिनिधित्व


प्रशासक न्यूज,दि.१५डिसेंबर

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा श्रीगोंदा मुले या शाळेचा इयत्ता तिसरी चा विद्यार्थी शौर्य स्वानंद चव्हाण(राऊत) हा रोलर स्केटिंग स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. राज्य पातळीवर झालेल्या रोलर स्केटींग स्पर्धेत शौर्यने उत्कृष्ट कामगिरी करत अल्पावधीतच यश खेचुन आणले आहे. या यशाबद्दल जि.प.प्राथ.शाळा श्रीगोंदा मुले येथे मुले,मुली व उर्दु शाळेने एकत्रितपणे नुकताच शौर्यचा सन्मान केेला आहे.यावेळी त्याचे पालक ऍड स्वानंद चव्हाण(राऊत)यांचादेखील शाळेच्या वतीने सन्मान करण्यात आला
श्रीगोंदा शहरामध्ये तालुका स्तरीय क्रिडा संकुल असुन त्याची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. क्रिडा संकुल वापरण्याच्या स्थितीत नसल्याने खेळाडु खंत व्यक्त करत आहे. या अशा परिस्थितीमध्ये प्रशिक्षक जयेश आनंदकर हे महाविद्यालयाच्या मैदानावर,मंगल कार्यालयात तसेच रोडवर सराव घेत आहेत. अशा प्रतिकुल परिस्थीतीला तोंड देत व प्रशिक्षण घेत शौर्यने यश संपादन केले आहे. यामुळे या यशाला एक उंची प्राप्त झाली आहे. यावेळी शौर्य यास पुस्तक, सन्मानचिन्ह, गुलाब पुष्प देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमासाठी पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी अनिल शिंदे,शिक्षण विस्तार अधिकारी निळकंठ बोरुडे, केंद्र प्रमुख उत्तरेश्वर मोहोळकर, शा.व्य.समिती मुले अध्यक्ष प्रकाश बोरुडे, शा.व्य.समिती मुली अध्यक्ष दत्ताजी जगताप, शा.व्य.समिती उर्दु शाळा अध्यक्ष नासिरभाई शेख, उपाध्यक्ष अजिम जकाते, श्रीगोंदा मुले शाळा मुख्याध्यापक साबळे, शा.व्य.समितीचे सदस्य अरविंद चव्हाण, श्रीगोंदा मुली शाळा मुख्याध्यापिका खराडे मॅडम, सदस्य चंद्रकांत औटी, सौ.रुपाली बोरुडे, अश्विनी रणसिंग, रेश्मा जांभळे, विद्या घोडके तसेच सर्व सदस्य, प्रशिक्षक आनंदकर सर, शौर्यचे आई बाबा, मावशी व काका उपस्थित होते. शौर्यला आनंदकर सर, साबळे सर व वर्ग शिक्षिका नंदा माने मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.

सुत्रसंचालन साबळे सर यांनी केले तर आभार गावडे मॅडम यांनी मानले.
श्रीगोंदयाचा विद्यार्थी राष्ट्रीय पातळीवर करणार राज्याचे प्रतिनिधित्व श्रीगोंदयाचा विद्यार्थी राष्ट्रीय पातळीवर करणार राज्याचे प्रतिनिधित्व Reviewed by Prashasak on डिसेंबर १५, २०२२ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.