प्रशासक न्यूज,दि.३०नोव्हेंबर
वडाळी येथील शालन वागसकर या महिलेला कुऱ्हाडीने मारहाण करत तिला गंभीर जखमी करून ७०हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना २६नोव्हेंबर रोजी श्रीगोंदा तालुक्यातील वडाळी गावात घडली होती या जबरी चोरीच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती
या प्रकरणाचा छडा लावत आरोपी अटक करण्याचे आवाहन श्रीगोंदा पोलिसांसमोर होते त्यामुळे पोलिसांनी वेगाने तपासचक्रे फिरवत अवघ्या तीन दिवसात या जबरी चोरीतील मुख्य आरोपी जेरबंद करत मुद्देमाल देखील जप्त केला आहे
सदर घटना घडल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन या प्रकरणाचा तपास करण्याच्या सुचना श्रीगोंदा पोलीस निरीक्षकांना दिल्या होत्या
त्या सूचनेनुसार श्रीगोंदा पो नि रामराव ढिकले यांनी सहायक पो नि महेश जानकर,पो उप नि समीर अभंग,सहायक फौजदार अंकुश ढवळे,पो ना गोकुळ इंगवले,पो कॉ प्रकाश मांडगे,किरण बोराडे,दादासाहेब टाके,अमोल कोतकर,रवींद्र जाधव या पथकाला सोबत घेऊन तपासला सुरुवात केली
तपासा दरम्यान सदर चोरी ही आदित्य कांतीलाल काळे वय २०वर्षे रा लिंबेजळगाव ता गंगापूर,जि औरंगाबाद याने त्याच्या दोन साथीदारांसह केल्याचे निष्पन्न झाले आरोपी आदित्य काळे याचा शोध घेतला असता तो पिंपळगावपिसा शिवारात असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली मिळालेल्या माहितीनुसार श्रीगोंदा पोलीस व गुन्हे प्रगटिकरण शाखा यांनी दि.२८नोव्हेंबर रोजी पिंपळगावपिसा शिवारात कोंबिंग ऑपरेशन राबवत आदित्य काळे याला ताब्यात घेतले त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता सदर गुन्हा त्याने लंगड्या उर्फ गिल्या रमेश काळे,आलूशा उर्फ दिनेश रमेश काळे दोघे रा मोहरवाडी यांच्यासह केल्याची पोलिसांना कबुली दिली सदर दोन्ही आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत
आरोपी आदित्य काळे याच्याकडून या चोरीतील १०ग्रॅम वजनाचे ५२हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मनिमंगळसूत्र हस्तगत केले आहे
वरील तीन ही आरोपिविरोधात आळेफाटा,बेलवंडी,श्रीगोंदा,चांदवड अश्या विविध पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत
जबरी चोरीचा तीन दिवसातच छडा लावल्यामुळे पोलिसांचे कौतुक होत आहे
'त्या' प्रकरणाचा तीन दिवसात पोलिसांनी लावला छडा
Reviewed by Prashasak
on
नोव्हेंबर ३०, २०२२
Rating:
Reviewed by Prashasak
on
नोव्हेंबर ३०, २०२२
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: