धक्कादायक! नातवाने मुलगी पळवली म्हणून आजीला विवस्त्र करुन मारहाण


प्रशासक न्यूज,दि.५डिसेंबर


नातवाने मुलगी पळवली म्हणून त्याच्या आजीला विवस्त्र करुन मारहाण करण्यात आली. एवढंच नाही तर त्या मारहाणीचा व्हिडिओसुद्धा बनवण्यात आला आहे. या प्रकरणी गंगापूर पोलीस स्टेशनमध्ये रविवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. संभाजीनगरमधील गंगापूर तालुक्यात ही घटना घडली आहे
संभाजीनगरमधील वझर गावात मुलीला पळवल्याचा आरोप करत एका वृद्ध महिलेला विवस्त्र करून मारहाण करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे मारहाण करतानाचा व्हिडिओ तयार करत आरोपींकडून हा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल देखील करण्यात आला आहे. विवेक उर्फ चवल्या पिंपळे याच्यासह दोघांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. गंगापूर फाट्यावर ही महिला राहते. तीच्या नातवाने मुलीला पळवून आणलं असा आरोप करत सदर आरोपी घरी आला. आणि या वृद्ध महिलेला विवस्त्र करुन मारहाण केल्याचा आरोप आहे. गंगापूर पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
विवस्त्र करून मारहाण
मिळालेल्या माहितीनुसार संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यातील गंगापूर फाट्यावर असलेल्या पारधी वस्तीवर मारहाण झालेली वृद्ध महिला आपल्या नातवासोबत राहते. दरम्यान वृद्ध महिलेला ओझर येथील पारधी वस्तीवर आणल्यावर आरोपीने तिला मारहाण करायला सुरुवात केली. संतापजनक म्हणजे महिलेच्या अंगावरील सर्व कपडे काढून तिला विवस्त्र करत मारहाण करण्यात आली. यावेळी पीडित वृद्ध महिला हात जोडत होती, दयेची भीक मागत होती. मात्र आरोपींना तिच्यावर दया आली नाही.
धक्कादायक! नातवाने मुलगी पळवली म्हणून आजीला विवस्त्र करुन मारहाण धक्कादायक! नातवाने मुलगी पळवली म्हणून आजीला विवस्त्र करुन मारहाण Reviewed by Prashasak on डिसेंबर ०५, २०२२ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.