प्रशासक न्यूज,दि.२६नोव्हेंबर
श्रीगोंदा तालुक्यातील वडाळी गावच्या शिवारात आज मध्यरात्री दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यात एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना घडली असून या दरोड्याच्या घटनेने तालुका पुन्हा एकदा हादरला आहे
सौ शालन शिवाजी वागसकर वय ५० वर्षे रा वागसकर मळा,वडाळी या दरोडेखोरांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर नगर येथील खासगी रूग्णालयात उपचार चालू आहेत
६०हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व १०हजार रुपये रोख रक्कम असा एकूण ७०रुपये किंमतीचा मुद्देमाल दरोडेखोरांनी चोरून नेला आहे सदर घटनेबाबत शिवाजी रामभाऊ वागसकर वय ६३ यांच्या फिर्यादीवरून तीन अज्ञात दरोडेखोरांविरोधात श्रीगोंदा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे
याबाबत मिळालेली माहिती अशी की वागसकर पती पत्नी हे वरील ठिकाणी त्यांच्या राहत्या घरी झोपलेले असताना आज मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास तीन दरोडेखोरांनी त्यांच्या घराच्या किचनचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला घरातील सामानाची उचकापचक करत असतानाच वागसकर पती पत्नी जागे झाले तेव्हा दरोडेखोरांनी शिवाजी वागसकर याना मारहाण केली तर त्यांच्या पत्नी शालन यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करुन त्यांना गंभीर जखमी केले त्यानंतर घरातील मुद्देमाल घेऊन चोरटे पसार झाले
श्रीगोंदा पोलिसांना घटनेची माहिती समजल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,कर्जत पोलीस उपअधीक्षक आण्णासाहेब जाधव,पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी घटनास्थळी भेट दिली
श्वानपथक व ठसेतज्ञाना पाचारण करण्यात आले होते पुढील तपास पोलीस करत आहेत दरोड्याच्या घटनेमुळे परिसरात घाबराट पसरली आहे
दरोड्याच्या घटनेने श्रीगोंदा तालुका हादरला;मारहाणीत महिला गंभीर जखमी
Reviewed by Prashasak
on
नोव्हेंबर २६, २०२२
Rating:
Reviewed by Prashasak
on
नोव्हेंबर २६, २०२२
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: