जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनातच नगरसेवकांमध्ये जुंपली;नगरपरिषदेच राजकारण तापल


प्रशासक न्यूज,दि.२४नोव्हेंबर

श्रीगोंदा नगरपरिषदेचे राजकीय वातावरण ऐन कडाक्याच्या थंडीत तापल्याचे पाहायला मिळत आहे काल जिल्हाधिकारी कार्यालय नगर येथे श्रीगोंदा नगराध्यक्षा अविश्वास ठराव प्रकरणी सुनावणी होती या सुनावणी दरम्यानच उपजिल्हाधिकारी पाटील यांच्या दालनातच भाजप नगरसेवक अशोक खेंडके व काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक मनोहर पोटे यांच्यात चांगलीच शाब्दिक खडाजंगी झाली त्यामुळे या अविश्वास ठराव प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे नगरसेवकांमधील खडाजंगी,अरेरावीची भाषा या प्रकरणाची जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात देखील चर्चा रंगली होती
या प्रकरणाबाबत समजलेली माहिती अशी की,जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांच्या अनुपस्थितीत आरडीसी राजेंद्र पाटील यांच्यासमोर काल ही सुनावणी पार पडली ही सुनावणी झाल्यावर आरडीसी पाटील बाहेर पडताच काँग्रेस चे नगरसेवक तथा नगराध्यक्षा शुभांगी पोटे यांचे पती मनोहर पोटे यांनी तिथे बसलेल्या भाजपच्या नगरसेवकांकडे पाहून अर्वाच्य भाषा वापरत माझ्या पत्नीचे पद घालवता मी बघून घेईल असे म्हणत दमदाटी करायला सुरुवात केली त्यावर भाजपच्या महिला नगरसेविका छाया गोरे यांनी पोटे याना समजावत इथे महिला नगरसेविका आहेत शब्द जपून वापरा असे म्हणत समजवण्याचा प्रयत्न केला त्याठिकाणी उपस्थित इतर नगरसेवकांनी देखील पोटे यांना समजवण्याचा प्रयत्न केला परंतु पोटे यांनी त्याला दाद दिली नाही
त्यानंतर सुद्धा पोटे यांनी आपली अरेरावी सुरू ठेवत भाजपच्या नगरसेवकांना उद्देशून तुम्हाला अकरा जणांना मी जास्त सांभाळले त्यामुळे माझे पाच सहकारी नगरसेवक दुरावले असा शब्द वापरला त्यावर आक्षेप घेत भाजप नगरसेवक अशोक खेंडके यांनी तुम्ही आम्हाला काय सांभाळले आम्ही तुमच्या कोणत्या गोष्टीला मिंध्ये नाहीत असे म्हणत पोटे यांना कायदेशीर प्रक्रिया आहे ती कायद्यानेच होऊ द्या त्यावर वाद घालू नका असे सांगून समजवण्याचा प्रयत्न केला पण त्यानंतर सुद्धा पोटे व खेंडके यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडून चांगलीच खडाजंगी झाली

उपजिल्हाधिकार्यांच्याच दालनात नगरसेवकांमध्ये जुंपल्यामुळे या प्रकरणाची चांगलीच चर्चा रंगली आहे काल सुनावणी दरम्यान पोटे यांनी नगरपालिकेचे म्हणणे व आरोप करणाऱ्या नगरसेवकांचे म्हणणे याची नक्कल मागून त्यावर अभ्यास करण्यासाठी वेळ मागितला त्यावर पाटील यांनी त्यांना मुदत दिल्यामुळे या प्रकरणी पुन्हा पुढची सुनावणी होणार आहे

काल घडलेल्या या प्रकरणामुळे राजकारणाची पातळी दिवसेंदिवस ढासळत चालली असून जनतेने ज्या लोकप्रतिनिधींना निवडून दिले तेच आपसात वाद घालत बसले तर जनतेचा विकास कसा होणार नेत्यांनी संयम बाळगत कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जाऊन लोकशाहीचा मान राखणे गरजेचे असल्याचे मत सर्वसामान्य जनतेमधून व्यक्त होत आहे

चौकट/-माझी बदनामी करण्याचे हे षडयंत्र/-काँग्रेस नगरसेवक मनोहर पोटे
मी कोणत्याही महिलेला कधीच अपशब्द वापरलेला नाही माझी पत्नी सुद्धा नगराध्यक्षा आहे मी महिलांचा कायमच आदर केला आहे त्यामुळे मी महिला नगरसेवकांना अपशब्द वापरले,दमदाटी केल्याचा आरोप खोटा आहे तसेच काल अशी कोणतीच शाब्दिक चकमक किंवा खडाजंगी झाली नसून मला बदनाम करण्याचे हे षडयंत्र असल्याची प्रतिक्रिया मनोहर पोटे यांनी दिली आहे

चौकट/-महिला नगरसेवकांबद्दल अपशब्द वापरणे,अरेरावीची भाषा वापरणे चुकीचे/-भाजप नगरसेवक अशोक खेंडके
काल उपजिल्हाधिकार्यांच्या दालनात पोटे यांनी महिला नगरसेविकांबद्दल अपशब्द वापरले त्यामुळे मी त्यांना कायदेशीर प्रक्रियेने तुम्ही लढा आम्ही पण लढू दमदाटी करू नका अपशब्द वापरू नका असे सांगितले तसेच पोटे यांच्या कोणत्याच गोष्टीला आम्ही लाजींदार नाहीत उलट शहराच्या विकासासाठी आम्ही त्यांना आतापर्यत सहकार्य केलेले आहे अश्या प्रकारे अरेरावीची भाषा वापरणे चुकीचे आहे
जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनातच नगरसेवकांमध्ये जुंपली;नगरपरिषदेच राजकारण तापल जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनातच नगरसेवकांमध्ये जुंपली;नगरपरिषदेच राजकारण तापल Reviewed by Prashasak on नोव्हेंबर २३, २०२२ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.